


खोटे सोने देत केली फसवणूक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात एका व्यापारयाची खोटे सोने देत ८लाख रुपयांची फसवणूक झाली आहे .गणेश महादेव खेत्रे यांच्या फिर्यादीवरून तीघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जामखेड शहरातील गणेश महादेव खेत्रे वय ३०वर्षे, रा. महादेव गल्ली, जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे जामखेड शहरात भारतीय जनता पक्षाच्या
संपर्क कार्यालया शेजारी क्रिएटिव्ह मेन्स वेअर नावाचे कापड दुकान आहे. कापड दुकानामध्ये सुमारे एक महिन्यापुर्वी एक महिला व दोन अनोळखी इसम कपडे खरेदीसाठी आले होते व त्यांनी काही कपडे खरेदी केले होते. त्यानंतर सुमारे १५ दिवसांपूर्वी सदर इसम हे पुन्हा माझे दुकानात आले.
त्यापैकी एका इसमाचे त्याचे नाव प्रजापती असे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ते तिघेही आम्हाला म्हणाले की, आमचेकडे जुने सोन्याच्या वस्तु आहेत. त्या तुम्ही चेक करुन पहा असे म्हणुन त्यांनी मला सोन्याचे मणी असलेला एक माळांचा गुच्छ दाखविला व त्यातील दोन मणी तोडुन त्यांनी मला देवुन हे चेक करुन पहा असे म्हणाले व निघुन गेले. त्यानंतर मी सदर मणी जामखेड शहरातील एका सोनाराच्या दुकानात घेवुन गेलो असता त्यांनी ते खरे सोने असल्याचे सांगितले.
सदर इसमांपैकी प्रजापती हा मला नेहमी फोन करत असे व आमचेकडे अजुन जुन्या सोन्याच्या वस्तु असुन त्या तुम्ही रक्कम १० लाख रुपयांचामध्ये विकत घ्या असे म्हणत असे. त्यावेळी मी त्यांना ८ लाख रुपये देईल असे सांगितले होते.ते तयार झाले .त्यानंतर दि २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वा. प्रजापती व त्यांचे बरोबर ते दोन जण माझे दुकानामध्ये आले .त्या महिलेकडे मी ८ लाख रुपये रोख दिले.त्यावेळी प्रजापती व त्याचेसोबत असलेल्या त्या अनोळखी इसमाने त्यांचेकडे असलेले जांभळ्या रंगाचे पिशवीमधील काळे रंगाचे प्लास्टीक पिशवीमधील सोन्याचे मणी असलेला माळ्याचा गुच्छ मला दिला व तेथुन निघुन गेले.नंतर मी सोन्याचे मणी
असलेला माळेचा गुच्छ घेवुन सोनाराच्या दुकानात सदर गुच्छ चेक केली असता सदर सोने खोटे असल्याचे सांगितले तेव्हा मला धक्का बसला मी प्रजापती यांच्या नंबर वर फोन केला असता सदर नंबर बंद लागत असल्याने माझी फसवणुक झाली बाबत माझी खात्री झाली. तेव्हा जामखेड पोलीस स्टेशनला तिघांजनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्टेबल संतोष कोपनर करत आहेत.
नागरिकांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये .तसेच अनेकजण ऑनलाईन व्यवहार करतात .सर्व बाबींची काळजी घ्यावी खात्री करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे .
यासीन शेख 9423391215