Homeव्हिडिओ बातम्याहिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा शांततेत पार पाडावी -बाजीराव गोपाळघरे...

हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा शांततेत पार पाडावी -बाजीराव गोपाळघरे यांचे अवाहन: राज्यभरातुन भाविकांचा लोंढा

जामखेड प्रतिनिधी

 

जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावची कानिफनाथ यात्रा हिंदू मुस्लीम तसेच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक समजले जाते. ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी केले आहे.

कानिफनाथ यात्रेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नगर,इत्यादी भागातून मोठ्या प्रमाणात भाविक खर्डा येथे येऊन या यात्रेची शोभा वाढवतात. ही यात्रा मागील वर्षांपासून दोन दिवस भरते. खर्डा येथील कानिफनाथ यात्रा महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे. दि. २४ व २५ मार्च दरम्यान चालणाऱ्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी खर्डा ग्रामपंचायतकडून पिण्यासाठी पाणी, सावलीसाठी मंडपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांनी रांगेत दर्शन घेण्यासाठी व महिलांची सुरक्षा करणेसाठी, खर्डा पोलिस स्टेशनच्या वतीने आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेत कोणीही गोंधळ घालू नये व यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केले आहे.

तसेच या वर्षीसाठी “आय लव खर्डा” या ग्रुपने यावर्षी कानिफनाथ यात्रेसाठी एक वेगळे आकर्षण म्हणून कानिफनाथ यात्रा व खर्डा परिसरातील १२ ज्योतिर्लिंग यांची हेलीकॉप्टर मधून दर्शन घडविण्यासाठी खर्डा येथे एक हेलीकॉप्टर आणले आहे. त्याचाही आनंद येथील भाविकांनी घ्यावा. एकंदरच ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भाविकांनी काळजी घेण्याबरोबरच प्रशासनालाही सहकार्य करावे असे आवाहन जामखेड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे. त्याबरोबरच त्यांना यात्रेनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!