Homeव्हिडिओ बातम्यासुजय दादा, दिल्लीत वजन वापरलं, तिकीट आणलं ! पण रामाशिवाय पान हलणार...

सुजय दादा, दिल्लीत वजन वापरलं, तिकीट आणलं ! पण रामाशिवाय पान हलणार का?? खा सूजय विखेंनी पी ए व चेलेचपाटेंना आवर घालावी

जामखेड प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आहिल्यादेवीनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदारकी लढण्यासाठी खा डॉ सुजय विखे यांनी नेहमीप्रमाणे आपले कसब / वजन वापरले आणि दिल्लीहून तिकीट आणलं. पण दक्षिण मतदार संघात रामा शिवाय पान हलणार का?? मोठा प्रश्न आहे. विखे यांच्या ताठर, एकाधिकारशाही, मी पणाच्या भुमिकेला राम आणि राम समर्थक मदत करणार का?? सोडली पाहिजे ही भुमिका. विखे कुटुंब जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित कुटुंब आहे. सत्तेत पक्ष कोणताही असो, विखे कायम सत्तेत (ओढुन ताणुन) राहण्याचे आपले कसब वापरतातच.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत आ प्रा राम शिंदे यांचा पराभव झाला की केला याबाबत अनेकवेळा बोलूनही दाखवले आहे. आजही कर्जत जामखेड तालुक्यातील आ प्रा राम शिंदे समर्थक विसरले नाहीत.माजी मंत्री आ प्रा राम शिंदे उघडपणे बोलणारे नेते आहेत. त्यांच्या भुमिकेचं जिल्ह्य़ातील भाजपा फार मोठ्या प्रमाणावर समर्थन करतात.त्यामुळे राम शिंदे यांच्या सहकार्याशिवाय भाजपा पक्षाचा खासदार निवडुन येणे शक्य नाही. आ राम शिंदे समर्थक विखे यांचे निवडणुकीत काम करतील मात्र विखे यांनी समन्वयाची भुमिका केली पाहिजे. जुळवून घेणे आवश्यक आहे.राम शिंदे समर्थकांना डावलून चालणार नाही. विखे यांचे पीए आणि काही चेलेचपाटे जास्त भेदभाव करतांना दिसतात. स्थानिकांना कमी लेखतात. त्यांच्यामुळेच समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. पाच वर्षे हेच केले आहे अशी सर्व स्त्तरातून तक्रारी आहेत. त्यामूळेच विरोधी सुर उमटत आहे.पीए आणि चेलेचपाटयांमुळेच सध्याचे विरोधी वावटळ उठलं आहे. याचा विचार सुजान नेते खा डॉ सूजय विखे यांनी करावा.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!