जामखेड प्रतिनिधी
जामखेड ते अजमेर हरिद्वार असा दोन हजार किलोमीटर यशस्वी सायकल प्रवास करून आलेल्या सायकलस्वार मित्राचा सत्कार कानिफनाथ नागरगोजे यांनी आपल्या मित्रासमवेत केला.
यावेळी कानिफनाथ नागरगोजे ,रामहरी ओमासे, कूद्दूसभाई शेख, दादा घोडेस्वार, सिद्धू तुपेरे, राजू झगडे, माऊली सानप, स्वेत वीर, विठ्ठल सानप, रविंद्र पुलावळे, शूभम पूलावळे ,कृष्णा वीर आदी मित्र उपस्थित होते .दि १ जानेवारी २०२४ रोजी जामखेडचे सर्वपरिचित असलेले उत्कृष्ट सायकलस्वार समीर शेख
इंधन बचाव प्रदूषण घटाव, पर्यावरण संवर्धन हा संदेश देत आरोग्यदायी शरीराला व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी जामखेड ते अजमेर -हरिद्वार असा २००० कि मी सायकल प्रवासासाठी रवाना झाले होते. सायकलिंग क्लबचे सदस्य असलेले समीर शेख हे वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. रोज २०० किमी सायकल प्रवास करत जामखेड ते हरिद्वार हा प्रवास १० दिवसांत पूर्ण केला आहे. समीर शेख यांचा जीवन प्रवास तरूणांना प्रेरणादायी असा आहे. सायकलस्वार समीर शेख व प्रवासात साथ देणारे जुबेर काझी यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे .