जामखेड प्रतिनिधी
भाजपा संविधान विरोधी पक्ष आहे.
महापुरुषांचं अपमान करणारा पक्ष आहे.
भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानाचे रक्षण करणारया तसेच
शिव शाहू फूले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारयांच्या पाठीशी आम्ही राहणार असे स्वाभिमानी भीमसैनिकांनी आमदार रोहित पवार यांना पाठींबा देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीत जामखेड तालुक्यातील स्वाभिमानी भीमसैनिकांनी आ रोहित पवार यांना पाठिंबा जाहीर केला असुन याबाबत १५ नोव्हेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रा विकी घायतडक यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना स्वभिमानी भीमसैनिकांनी सांगितले की महाविकास आघाडीला
मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी व न्यायप्राप्तीसाठी अखंडपणे लढा देणारे, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मा. आ. रोहितदादा पवार यांनी आपल्या नेतृत्वातून अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात कर्जत जामखेड मतदारसंघात समाजातील मागासवर्गीय बांधवांना सतत आधार व न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
1.मराठवाडा विद्यापीठ नामांतर मुद्दा: मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर शरद पवार साहेबांनी मोठे राजकीय साहस दाखवले, ज्यामुळे विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
2. बौद्ध विहार निर्मिती: मा. आ. रोहितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने जामखेड येथे बौद्ध विहार निर्माणसाठी #DPDC च्या नगररचना विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला.
3. संविधान स्तंभ निर्मिती: कोरोनाच्या कठीण काळात 13 ते 14 दिवसांत संविधान स्तंभ उभारण्यात आला, जो आज सामाजिक एकतेचे प्रतीक बनले आहे.
4. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मदत: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विविध शैक्षणिक मदतीसाठी रोहितदादा पवार यांनी वेळोवेळी आवश्यक पाठपुरावा केला.
5. दलित वस्त्यांमध्ये विकास कार्य: दलित वस्त्यांमध्ये विविध पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी रोहितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
6. आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक: सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी आणि त्यांच्या वारसदारांच्या राहत्या घराच्या बांधकामासाठी आमदार रोहितदादा पवार स्वखर्चातून निधी उपलब्ध करून दिला आणि आता त्या घराचे काम सध्या सुरू आहे.
7. महापुरुषांचा सन्मान: महापुरुषांचा सतत अवमान करणार्या वक्तव्यांवर जामखेड शहर बंद ठेवण्यात आले, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
8. सामाजिक उत्सव साजरे करणे: दलित समाजातील विविध सण-उत्सव आनंदाने साजरे करण्यासाठी रोहितदादांनी आवश्यक ती मदत पुरवली आहे.
9. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन दिन: जामखेडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिवर्तन दिनानिमित्त विविध मंडळांना मदत पुरवून समाजाचा उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य केले आहे.
10. कार्यक्रमांची सुरुवात संविधान स्तंभावर अभिवादनाने: रोहितदादा पवार यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात संविधान स्तंभावर अभिवादन करून केली आहे. संघर्ष यात्रेची सुरूवातही संविधान स्तंभाला अभिवादन करून झाली, आणि शेवट नागपूरच्या दीक्षाभूमीवर केला गेला.
शरद पवार साहेब आणि मा. रोहितदादा पवार यांनी सतत समाजाच्या सर्व थरातील लोकांना सोबत घेऊन प्रगतीची वाट दाखवली आहे. त्यांच्या कार्यातून समाजातील वंचित, दुर्बल व मागासवर्गीय बांधवांना सतत आधार मिळाला आहे.
मात्र भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यापासून
1. निधी गोठवणे व अनुशेष भरती: मागासवर्गीयांच्या अनुकंपेची अनुशेष भरती थांबविण्यात आली आहे. तसेच SC, ST, OBC साठी पदोन्नतीत आरक्षण देण्यासही सरकारने अडथळे आणले आहेत.
2. रोजगार निर्मिती अभाव: राज्यात नवीन रोजगार निर्मिती होत नसल्यामुळे तरुणांना योग्य संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे.
3.भाजपच्या लोकांनी वारंवार महापुरुषांचा आपमाण केला आहे.
PhD संशोधक विद्यार्थ्यांची बार्टी ची शिष्यवृत्ती अडवली आहे..
राम शिंदे यांनी 10 खात्याचे मंत्री असताना एकही रुपया निधी दलित आमच्या प्रश्नांसाठी खर्च केला नाही. कोणतेही विकासकामे केले नाहीत..
त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व बहुजन वंचित आणि दलित समाज या निवडणुकीत रोहितदादा यांनाच साथ देणार आहे. आम्ही आमदार रोहित दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत.. आणि रोहितदादांना 1 लाखाच्या लीड ने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत