Homeव्हिडिओ बातम्यासंभाजी ब्रिगेडचा आमदार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा*

संभाजी ब्रिगेडचा आमदार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा*

जामखेड प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकासआघाडीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे अहिल्यानगरचे उपजिल्हाध्यक्ष महादेव जाधव, कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला .यावेळी संभाजी ब्रिगेडचे राशीन शहर अध्यक्ष मुन्नाभाई मुंडे, मयूर धनवडे, संतोष डोरले, प्रशांत कानगुडे, महादेव सपाटे, नाथा पवार, गोरख लोहार, योगेश गायकवाड, महेश लोहार, गणेश गवळी, ऋषीकेश जाधव, महेश काळे, विनोद टाक आणि केतन वाघ हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!