Homeव्हिडिओ बातम्याशिवरायांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाराचा आदर्श घ्यावा :- रमेशभाऊ गुगळे सदाबाई गुगळे भामाबाई...

शिवरायांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाराचा आदर्श घ्यावा :- रमेशभाऊ गुगळे सदाबाई गुगळे भामाबाई शिंदे आदर्शमाता संजय काशीद दाम्पत्याचा शिवजन्मोत्सवानिमित्त आगळावेगळा

 

शिवरायांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाराचा आदर्श घ्यावा :- रमेशभाऊ गुगळे

सदाबाई गुगळे भामाबाई शिंदे आदर्शमाता

संजय काशीद दाम्पत्याचा शिवजन्मोत्सवानिमित्त आगळावेगळा
जामखेड प्रतिनिधी

आजही आदर्श माता म्हणून माता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी याच आदर्शवत आहेत. जिजाऊंनी कठीण परिस्थितीतून शिवरायाला घडविले. पूढे याच शिवरायाने सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले. शिवरायांच्या न्यायप्रिय व सर्वसमावेशक राज्यकारभाराचा आदर्श घेण्याची आज फार गरज आहे. असे प्रतिपादन उद्योजक रमेशभाऊ गूगळे यांनी केले.
संजय काशीद व रोहिणी काशीद या दाम्पत्याने शिवजन्मोत्सवानिमित्त जामखेडकरांना इतिहास, संस्कृती व समाजसेवा अशा विविध कार्यक्रमांची एक आगळीवेगळी मेजवानी देत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी रमेशभाऊ बोलत होते.

जामखेड येथे शिवजन्मोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य दिव्य मिरवणूक, बाळ शिवाजी पाळणा, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान, आदर्श माता सन्मान व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

जामखेडचे उद्योजक रमेश गुगळे, दिलीप गुगळे व संजय गुगळे यांच्या मातोश्री सदाबाई गुगळे यांचा तसेच विधानपरिषद सभापती आ प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचा आदर्शमाता म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी जामखेड भूषण म्हणून कैलास महाराज भोरे, जामखेड गौरव म्हणून प्रा. सुनील नरके, स्व. सुरेश कुलथे (मरणोत्तर), जामखेड रत्न म्हणून डॉ. शिवानी विष्णू पन्हाळकर, मयूर भोसले. शैक्षणिक रत्न म्हणून मीना राळेभात, सर्पमित्र म्हणून
श्याम पंडित, याचबरोबर क्रीडा क्षेत्रात विविध पातळीवर नैपुण्य मिळवलेल्या २७ खेळाडूंना सन्मानित केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती रमेश गुगळे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कालें, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक विभिषण धनवडे, नगरसेवक मोहन पवार, विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते, लेखक एकनाथ चव्हाण, संचालक राहुल बेदमुथ्था, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. वैभव तांदळे, भरत जगदाळे, प्रा. सुनील नरके, प्रवीण चोरडिया, अल्ताफ शेख, ज्ञानेश्वर
कुलथे, नीलेश तवटे, अण्णासाहेब काशीद, बबलू टेकाळे, सूरज काळे, पप्पू काशीद, मयूर भोसले, संतोष शिंदे, संतोष भोंडवे, डॉ. विकी दळवी, उद्धव हुलगुंडे आदी उपस्थित होते.

Nagar, Nagar-Today 22/03/2025 Page No. 5

नाट्यस्पर्धेचा निकाल

■ माहिला शिवजन्मोत्सव सोहळा, २०२५ जामखेड सांस्कृतिक स्पर्धा

मोठा गट प्रथम : लिटल स्टार इंग्लिश स्कूल, खर्डा (नाटक-छावा)

■ ■ मोठा गट द्वितीय : स्वराज्य कन्या गौरी जंगम, (नाटक-पावनखिंड)

■ मोठा गट तृतीय : तांडव ग्रुप, (तांडव नृत्य)

उत्तेजनार्थ : शिवगर्जना ग्रुप, देवाचा गोंधळ गीत

■ लहान गट प्रथम : एकलव्य स्कूल, (एकच राजा)

■ लहान गट द्वितीय : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महादेव गल्ली,

(दैवत छत्रपती)

■ लहान गट तृतीय : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुरदैठण (आम्ही शिवकन्या)

■ उत्तेजनार्थ : विसडम हायस्कूल शेलार, मॅडम रिमिक्स साँग (ओ…

राजे..)

■ विजेत्या संघाला रोख रक्कम व सन्मानपत्र विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. परीक्षक म्हणून दीपक तुपेरे, मुकुंदराज सातपुते, अविनाश बोधले व शिवगंगा मत्रे यांनी काम पाहिले. हनुमंत निकम (महाराज) यांनी सूत्रसंचालन केले. केशवराज कोल्हे यांनी आभार मानले.

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!