जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवस्ती येथील मुख्याध्यापक आशोक घोडेस्वार यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. सर्व व्यवहार शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीनेच व पारदर्शी केलेला आहे तरी. काही विरोधकांकडून पत्रकबाजी करून
आदर्श मुख्याध्यापकाची व शाळेची विनाकारण बदनामी केली जात आहे जर ही बदनामी थांबली नाही तर सर्व ग्रामस्थासह जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तत्कालीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासाहेब कोल्हे यांनी दिला आहे.
कोल्हेवस्ती येथील तत्कालीन मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार यांच्या कार्यकाळातील आर्थिक कारभार तसेच शैक्षणिक प्रगती ही उल्लेखनीय असून शाळेतील सर्व आर्थिक व्यवहार हे शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीनेच झालेले आहेत व त्याचे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत ऑडिटही झालेले आहेत.
आशोक घोडेस्वार यांच्या कार्यकाळात शाळेचा पटही वाढला व विद्यार्थी गुणवत्ता देखील अतिशय उत्कृष्ट होती. तसेच वेळोवेळी त्यांनी स्वखर्चाने शाळेला मदत केलेली आहे. त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीची कोणत्याही प्रकारे दिशाभूल केली नाही सर्व व्यवहार आमच्या नियंत्रणेखाली पारदर्शीपणे केलेला आहे. वर्तमानपत्रातून व समाजमाध्यमातुन ज्या काही बातम्या छापून येत आहेत त्यामुळे आमच्या शाळेची व तत्कालीन आदर्श मुख्याध्यापकाची विनाकारण बदनामी होत आहे.
संबंधितांनी ही बदनामी लवकर थांबवावी अन्यथा सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा इशारा तत्कालीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासाहेब कोल्हे यांनी दिला आहे.