आरोपी अटक व काँलेज मान्यता रद्दसाठी उपोषण सुरूच.
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीपच्या व्यवस्थापनचा आडमुठेपणा पून्हा दिसला. तपासणीसाठी विद्यापीठ समिती येणार कळले की काँलेजला सूट्टी जाहीर केली म्हणजेच चौकशी समिती आणि व्यवस्थापन व काँलेज स्टाफचा संपर्क येऊ नये यासाठी असहकार्याचा व्यवस्थापनाने खटाटोप केला.
काँलेजच्या चाव्या नसल्याने चौकशीसाठी आलेल्या विद्यापीठ समितीला 2-3 तास काँलेजच्या गेटवर थांबावे लागले. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि रायगडचे डॉ विशाल पांडे, डॉ संतोष शेळके, डॉ ब्रिजेश आय्यर, डॉ एस आर भगत.तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नासिकचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक संदिप कुलकर्णी , डॉ अभय पाटकर प्रा नासिक, होमिओपॅथी काँलेज कोल्हापूरचे डॉ मिलिंद गायकवाड याची विद्यापीठ समिती रत्नदीपवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी आले होते. यावेळी काँलेजचे गेट बंद होते. या समितीला काँलेजच्या गेटवर 2-3 तास व्यवस्थापनाची वाट पहात ताटकळत थांबावे लागले. समितीसमोर दोन शिक्षक आले असता व्यवस्थापनाने काँलेजला सूट्टी जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.चौकशीसाठी समिती आली त्याच दिवशी काही शिक्षकांनी राजीनामा दिल्याचे समजले.नंतर विद्यापीठ समितीने काँलेज मध्ये जाऊन फीरून तपासणी केली असता अनेक गंभीर त्रुट्या समोर आल्या.तीन विद्यापीठांचे BAM S, BHMS , D Farm, B Farm , M Farm , Narsing या ६ पदवी पदविका शिक्षणासाठी राज्याच्या व देशाच्या कानकोपऱ्यातून शेकडो मुल – मुलीनी प्रवेश घेतलेला आहे. मात्र स्वतंत्रपणे वर्ग नसुन एक दोन रूम मध्ये आलटूनपालटून वर्ग भरविण्यात येतात
वरीलपैकी कोणत्या काँलेजला स्वतंत्र प्रिन्सिपल नाही.स्वतंत्र शिक्षक स्टाफ नाही एकुणच शिक्षणाचं शुन्य काम आहे.असे स्पष्ट निदर्शनास आले.
त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि रायगडचे डॉ विशाल पांडे, डॉ संतोष शेळके, डॉ ब्रिजेश आय्यर, डॉ एस आर भगत यांच्या समितीने रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन संस्थेवर कडक कारवाईचे करण्याचे अश्वासन दिले.
गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. दि ८ मार्च रोजी पुणे विद्यापीठाची कमीटी येऊन गेल्या नंतर दि ९ मार्च रोजी रायगड व नाशिक येथील कमिटीच्या सदस्यांनी उपोषणस्थळी येऊन विद्यार्थी व उपोषणकर्त्यांच्या भावना जाणुन घेतल्या तसेच आरोपीला अटक व कॉलेजची मान्यता जोपर्यंत रद्द करण्यात येत तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच रहाणार असे मत आंदोलनकर्त्या विद्यार्थीनी सांगितले. –
——————-
—अटक कधी…. ? ?
पुणे विद्यापीठाच्या समितीने सहा लँब सिल केल्या.सर्वच बाबी अक्षेपार्हे आहेत. संपुर्ण काँलेजच सिल का होत नाही. तसेच गून्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात आरोपीला अटक केले जाईल असे पोलीस आधिकारयांकडुन सांगण्यात आले होते. अटकेची कारवाई कुठवर आली आहे असे उपस्थितांमधून यावेळी विचारले गेले