Homeव्हिडिओ बातम्यालहान मुलांना बचतीची सवय लागण्यासाठी एच. यु. गुगळे पतसंस्थेचा अनोखा उपक्रम

लहान मुलांना बचतीची सवय लागण्यासाठी एच. यु. गुगळे पतसंस्थेचा अनोखा उपक्रम

२६ जानेवारीला फँमिली फंडाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील एच यू गुगळे पतसंस्थेने प्रत्येक कुटुंबातील मुलांना बचतीची सवय लागावी व त्याच्या उज्वल भविष्यासाठी अर्थिक स्थैर्य व मदत व्हावी यासाठी एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून ‘फॅमिली फंड’ ही एक अनोखी योजना सुरू केली असून तालुक्यातील प्रत्येक परिवाराने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात कापड, मेडिकल, बायोटेक, चित्रपट निर्मिती, रेस्टॉरंटच्या माध्यमातून उ‌द्योगाची यशस्वी उभारणी करून एच. युः गुगळे परिवाराने समाजात विश्वासार्हता निर्माण केली आहे .गुगळे कुटुंबाने १२ वर्षांपुर्वी बँकीग क्षेत्रातही पाऊल टाकल आणि अनेक गरजूना आर्थिक पाठबळ दिलं.उद्योग करण्यासाठी पाठबळ दिलं यामध्ये आर्थिक दृष्ट्‌या दुर्बल, शैक्षणिक दृष्ट्‌या गरजूना, सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला बचतगटाना ‘सक्षम’ बनविले लघुउद्योगांना चालना दिली. समाजातील गरजवंत कुटुंबातील महिलांना अर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होता यावे यासाठी पतसंस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपुर्वी महिला बचत गटांच्या माध्यमातून कर्जरूपाने आर्थिक साह्य केले .त्यामुळे
२५०० महिला व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व व्यवसायीक स्थैर्य लाभले आहे. या योजनेबाबत सांगताना रमेशभाऊ गुगळे म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाने ‘फॅमिली फंड’ या योजने अंतर्गत बचतीचे सूत्र स्विकारले तर कुटुंब उभारणीत मोठी मदत होऊ शकेल. बचतीचे महत्त्व सांगणारा पहिला धडा स्वतः च्या कुटुंबातून घेतला. रमेशभाऊंच्या आईने स्विकारलेला बचतीचा ‘फंडा’ त्यांना आठवला. रमेश भाऊंकचे वडील हरकचंदजी हे केवळ ऐंशी रुपये पगाराची मासिक नोकरी करीत होते. तेंव्हा त्यातूनही त्यांच्या मातोश्री ‘बाई’ दरमहा दहा रुपये बचत करायच्या आणि ती बचत पुढे कुटुंबासाठी खूप उपयुक्त ठरली. हे त्यांनी अनभवले आहे. त्यामुळे आपणही समाजातील अनेक कुटुबांमध्ये बचतीची बीज रोवण्याचा संकल्प त्यांनी स्विकारला. त्यानुसार रमेशभाऊंनी ठरविले की, बचतीचा हा ‘संस्कार’ कुटुंबातील लहान मुलांवर व्हायला हवा. त्यांना लहानपणीच बचतीची व बँकीगची सवय व्हायला हवी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून “फॅमिली फंड” हा उपक्रम विकसित केला गेलेला आहे.

काय आहे ‘फॅमिली फंड उपक्रम ?

यामध्ये एच. यु. गुगळे बँकेच्या माध्यमातून सहभागी कुटुंबाला “गृह बैंक” बचतीसाठी डबा दिला जाईल. त्यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्ती ‘फॅमिली फंड’ म्हणून आपल्या रकमेची बचत करतील. कुटुंबातील लहान मुलगा मुलगी यांच्या नावावर बँकमध्ये त्या कुटुंबाचे अकाउंट उघडले जाईल, या फॅमिली फंडमध्ये जमा होणारी रक्कम प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेला सदर मुलाच्या नावे बँकेच्या खात्यावर जमा करतील. सदर रकमेसाठी बँकेमार्फत मुलासाठी सहा टक्के तर मुलीसाठी साडेसहा टक्के व्याज दिले जाईल.
जामखेड व परिसरातील व्यक्तीने संस्थेमध्ये येऊन पैसे जमा करावयाचे आहेत. तर बाहेर गावच्या व्यक्तींनी क्यूआर कोड किंवा नेटबँकिंगने पैसे पाठवायचे आहेत. ती रक्कम त्या कुटुंबाला काही ठराविक मुदतीनंतर व्याजासह मिळेल. या माध्यमातून योजनेतील सहभागी कुटुंबातील लहान मुलांना लहान वयातच बचत व बैंकिंग ची सवय होईल. या बचतीचा त्यांच्या भावी आयुष्यासाठी फार मोठा उपयोग होईल. या हेतूने हा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती रमेशभाऊ गुगळे यांनी दिली आहे. अशा प्रकारचा उपक्रम बहुदा महाराष्ट्रात एकमेव असावा. असे त्यांचे मत आहे.
दि. २६ जानेवारी रोजी विविध शासकीय अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते या योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून.
हा उपक्रम तालुक्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचवा यासाठी स्वतः बँकेचे चेअरमन स्मेश भाऊ गुगळे हे तालुक्यातील बहुतांश शाळांपर्यंत पोहोचून बचतीचा संदेश देणार आहेत. तसेच तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या बीड रोड जामखेड येथील शाखेला भेट द्यावी असे आवाहन रमेशभाऊ गुगळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!