Homeव्हिडिओ बातम्यारास्ता रोको आंदोलन स्थगित महामार्गाचे येत्या दहा दिवसांत काम काम मार्गी...

रास्ता रोको आंदोलन स्थगित महामार्गाचे येत्या दहा दिवसांत काम काम मार्गी लावण्याचे महामार्ग आधिकारयांचे लेखी आश्वासन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड सौतडा महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाची गती वाढवावी. नियमबाह्य होत असलेल्या कामात सूधारणा करावी. रस्त्यालगत असलेल्या व्यापारी नागरिकांना येणाऱ्या अडचणी बाबत विश्वासात घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी दि ५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात व जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात येणारा रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

येत्या दहा दिवसांत महामार्गाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल. तसेच इतरही अडचणीबाबत मार्ग काढण्याचे स्वरूपाचे लेखी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता यांनी लेखी आश्वासन दिले आहे.

या कामाचे संदर्भात दि. ४ एप्रिल रोजी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जामखेड पोलीस स्टेशन येथे एक समन्वयक बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष सूरेश भोसले यांच्या वतीने महामार्ग विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे काम नियमबाह्यारितीने होत असून महामार्गालगत राहणारे ग्रामस्थ व व्यावसायिकांचा कोणात्याही प्रकारे विचार न करता रस्त्याची उंची व ड्रेनेजचे काम केले जात आहे. गेल्या चाळीस वर्षापूर्वी रस्त्याच्या उंचीनुसार दोन्ही बाजूनी बांधकाम केली आहेत. परंतु काळाच्या ओघामध्ये ती रस्ता ३ ते ४ वेळा भरण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या लगतची सर्व बांधकामे ३-४ फुट खाली गेली आहेत. त्यामुळे पूर्वीची गटारही तितकीच खाली गेली आहे. त्यामुळे सध्या होत असलेले रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार व भविष्याचा विचार करून न केल्यास रस्ता व लगतची घरे व इमारती यामध्ये १० फुट अंतर राहणार आहे. व ती रस्त्याच्या ५ ते ६ फुट खाली जाणार आहेत.

त्यामुळे सर्व रहिवाशांचे ड्रेनेजचे पाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास पर्याय राहणार नाही. ते सर्व पाणी रस्त्याच्या गटारीमध्ये जाऊ शकणार नाही. त्यामुळे सर्व बाजारपेठ बाधीत होणार आहे. त्यामुळे आमची वरील समस्या सोडविल्याशिवाय किवा चर्चा केल्याशिवाय होणारे काम आम्ही करू देणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच रस्त्याचे काम फार संथ गतीने चालू आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे सर्व व्यापारी आणि नागरीकांना त्रास होत आहे. तरी त्या कामास गती आणावी अन्यथा काम बंद पाडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी दिला होता . या निवेदनावर जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, विजय कोठारी, विनायक राऊत, प्रकाश सदाफुले, किरण शिंदे, अंकुश उगले, अविनाश पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

 

 

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!