Homeव्हिडिओ बातम्याराष्ट्रवादीत गेल्या पावली परत भाजपात आले. राजेवाडीतील कार्यकर्त्यांची ४८ तासांत घरवापसी,...

राष्ट्रवादीत गेल्या पावली परत भाजपात आले. राजेवाडीतील कार्यकर्त्यांची ४८ तासांत घरवापसी, राष्ट्रवादीला जोरदार धक्का !

जामखेड प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलांच्या घडामोडींना वेग आला आहे. नूकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या राजेवाडी येथील कार्यकर्त्यांनी अवघ्या ४८ तासांत भाजपात घरवापसी केली.या घटनेची तालुक्यात मोठी चर्चा होत आहे.
या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीला पुन्हा जोरदार हादरा बसला आहे.

रोहित पवारांच्या मनमानी कारभाराविरोधात मतदारसंघातील गावागावात मोठी नाराजी उफाळून आली आहे. ही लाट थोपवण्यासाठी रोहित पवारांच्या यंत्रणेकडून अनेकांचा वेगवेगळी आमिषे दाखवून पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. परंतू त्यांचा हा डाव त्यांच्यावरच बुमरँग होताना दिसत आहे.

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील भाजपचे पै नामदेव कुमटकर यांनी सहकाऱ्यांसह रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दोन दिवसांपुर्वी प्रवेश केला होता. परंतू हा प्रवेश करुन ४८ तास उलटत नाही तोच पै नामदेव कुमटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन पुन्हा भाजपात प्रवेश केला. कुमटकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अर्थात रोहित पवारांना जोरदार हादरा बसला आहे.

राजेवाडीचे युवा नेते पै नामदेव कुमटकर यांच्यासमवेत समाधान कुमटकर, सुनील कुमटकर, लक्ष्मण कुमटकर, संभाजी निंबाळकर, नारायण गोरे, विकास सेंडकर, बाबासाहेब शेंडकर, बाळू शिंदे, भरत कुमटकर, लक्ष्मण शिकारे, रामा भोसले, योगेश गोरे, सुरज गोरे, विष्णू कुमटकर, राम गोरे, किसन निंबाळकर, बाबू गोरे, अतुल कूमटकर, दादा गोरे,निलेश कुमटकर, गजेंद्र ढेपे, भाऊसाहेब कूमटकर,दत्ता निंबाळकर, बंडु कुमटकर, प्रल्हाद शेंडकर गजेंद्र ढेपे या युवा कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांची आज चोंडी येथे भेट घेतली. गैरसमजातून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आमची चुक आमच्या लक्षात आली असून आम्ही पुन्हा भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून या सर्वांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. आमदार प्रा राम शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपा नेते सचिन पोटरे, बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, पै दत्ता शिंदे, विष्णू गंभीरे, राहूल चोरगे, दिनेश शिंदे, सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!