छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुस्त्यांचा हगामा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे कुस्ती संकुल व आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या मैदानी कुस्त्यांच्या जंगी हगाम्यात एक नंबरची कुस्ती पृथ्वीराज पाटील यांनी जिंकली.शंभूराजे कुस्ती संकुलचे पैलवान बापू जरे विरुद्ध पै. शिवराज चव्हाण यांच्यात झालेल्या कुस्तीत बापू जरे विजयी झाले तर चौथी कुस्तीही शंभूराजे कुस्ती संकुलचे पैलवान चिराग आजबे यांनी जिंकली. शंभूराजे कुस्ती संकुलचे मंगेश आजबे व आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन केलेल्या भव्य मैदानात ६०० पेक्षा जास्त पैलवान उपस्थित होते. कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. महाराष्ट्राच्या मातीचे आणि कुस्तीचे वेगळे नाते आहे हे
जपण्याचे काम शंभूराजे कुस्ती संकुल करत आहे. राज्यात व देशात शंभूराजे कुस्ती संकुल च्या मल्लांनी आपला ठसा उमटवला आहे.आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे कुस्ती संकुल गेल्या सहा वर्षापासून कुस्त्यांचा हगामा भरवत आहे. पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. महाराष्ट्राच्या मातीचे आणि कुस्ती चे वेगळे नाते आहे हे जपण्याचे काम शंभूराजे कुस्ती संकुल करत आहे. राज्यात व देशात शंभूराजे कुस्ती संकुल च्या मल्लांनी आपला ठसा उमटवला आहे.आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे कुस्ती संकुल गेल्या सहा वर्षापासून हे जंगी मैदान भरवले जात आहे. शंभूराजे कुस्ती संकुल मध्ये मंगेश आजबे हे शंभर मल्लांना मोफत कुस्ती प्रशिक्षणाचे धडे देत आहेत. यामुळे परिसरात कुस्तीचे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यावर्षीच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दोन मल्लांनी आपला ठसा उमटवला आहे.