Homeव्हिडिओ बातम्यारत्नदीपच्या उपोषणकर्त्यां मुलींची प्रकृती खराब ;तीनजण उपचारासाठी दाखल: मुलामुलींची मानसिकता ढासळत चालली...

रत्नदीपच्या उपोषणकर्त्यां मुलींची प्रकृती खराब ;तीनजण उपचारासाठी दाखल: मुलामुलींची मानसिकता ढासळत चालली आहे

जामखेड प्रतिनिधी

उपोषणकर्त्यां तीन मूलींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून अनेक मूलं मूलींना अशक्तपणा आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशन काॅलेजच्या संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या अन्याय व छळवणूकीच्या त्रासाला कंटाळुन होत असलेल्या अन्याया विरोधात मुलं मूलीनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आज चौथ्या दिवशी काही मुलींची प्रकृती खराब झाली. अशक्तपणा आला आहे. उपचार घेण्यास नकार दिला मात्र शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष उपोषणकर्ते पांडुरंग भोसले म्हणाले की काही मुलींनो तुम्ही उपचार घ्या. तुम्हाला त्रास झाला. जामखेडकरांचीही बदनामी होत आहे. त्यामुळे माझ्यासह जामखेड मधील राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक जामखेड तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही निर्भय व्हा. तेव्हा काही मूलींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.चार दिवसापासून आंदोलन उपोषण चालू असल्याने मुलं मूलींची मानसिकता ढासळत चालली आहे.त्याची प्रशासनावरही विश्वास राहीला नाही. महिला दिनाच्या दिवशीही मुलींना न्यायासाठी उपोषण करावे लागत आहे. ही दूर्दैवी बाब आहे.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
उपोषणस्थळी नागरिकांची गर्दी जमा होत आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!