जामखेड प्रतिनिधी
जामखेडचं नाव शैक्षणिक क्षेत्रात राज्यभर नेत अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन या संस्थेच्या अध्यक्षाच्या विरोधात विद्यार्थी व विद्यार्थींनींनी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्यावर विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींनी शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ भास्कर मोरेंवर विविध प्रकारचे आरोप होत आहेत.सदर काँलेज मधील सर्व मुल मुली बाहेर गावाहून शिक्षणासाठी जामखेडला आले आहेत. आपले शैक्षणिक व सामाजिक नूकसान होऊ नये म्हणून अनेक मूलं मूली अनेक वर्षांपासून त्रास व छळ सहन करत आहेत. नियतीप्रमाणे अति तिथं माती होणारच. मूल मूली रात्री ११.३० वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. अध्यक्षाकडून होत असलेल्या आर्थिक, शारीरिक व मानसिक, अन्याय, अत्याचाराचा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे. सदर मूलामूलींनी होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला आहे. या लढ्याला मनसे, संभाजी ब्रिगेड, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान तसेच जामखेड मधील सुज्ञ नागरिकांनी पाठींबा दिला. दि ५मार्च रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत मोर्चा पोलीस ठाण्यात बसून होता तसेच दि ६मार्च रोजी सकाळी रत्नदीप च्या स्कुल बसेस मोकळ्या गेल्या. रोजच्या प्रमाणे मुलंमुली आलेच नाहीत. बस स्थानकावर रत्नदीपचे मूलमूली दिसलेच नाहीत. रत्नदीपच्या अध्यक्षांच्या कारनाम्याविरोधात शिवप्रतिष्ठानच्या वतीने तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दि ६ मार्च रोजी दुपारी ४ वा मूलां मूलीसह मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.