Homeव्हिडिओ बातम्यायुवकांनी भाजपा सदस्य नोंदणी करुन भाजपा परिवारामध्ये सामील व्हावे : भाजपा युवा...

युवकांनी भाजपा सदस्य नोंदणी करुन भाजपा परिवारामध्ये सामील व्हावे : भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे 

युवकांनी भाजपा सदस्य नोंदणी करुन भाजपा परिवारामध्ये सामील व्हावे : भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे

जामखेड प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये जामखेड तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजपा परिवारात सामील व्हावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे.

यासाठी शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता जामखेड शहरातील कर्जत रोडवरील विठाई मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटन पर्व सुरू करण्याच्या दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात भाजप सदस्य नोंदणी अभियान नोंदणी सुरू आहे. याच अनुषंगाने जामखेड तालुक्यात मोठय़ा उत्साहात भाजपा सदस्य नोंदणीस सुरवात करण्यात आली असून तालुक्याभरातही बूथ निहाय सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे.

यासाठी संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठे परिश्रम घेत आहेत. त्याच अनुषंगाने युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने भाजपाचे सदस्य व्हावे असे आवाहन केले आहे. तसेच भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत भाजपा सदस्य होण्यासाठी 88 00 00 2024 या नंबरवर मिस्ड कॉल देण्याचे आवाहनही बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!