प्रविण बोलभट आण्णासाहेब ढवळे विष्णू गंभीर यांचा सामाजिक उपक्रम
जामखेड प्रतिनिधी
माजी मंत्री. आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .
याच अनुषंगाने सामाजिक जाणीवेतुन आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट, विष्णु गंभीरे यांच्या संकल्पनेतून मोफत मूळव्याध उपचार या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .दि १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ते सायं ७ वाजेपर्यंत डॉ भरत दारकुंडे यांच्या समर्थ हाँस्पीटलमध्ये या शिबीराचा आयोजन करण्यात आले आहे .याठिकाणी जगप्रसिद्ध मुळव्याध उपचार तज्ञ डॉ प्रदीप तुपेरे हे रूग्णांची तपासणी व उपचार करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले .मूळव्याध पाईल्सवर इंजेक्शन द्वारे ट्रिटमेंट ( स्क्लेरोथेरपी ) उपचार करण्यात येणार आहेत .उपचारासाठी येतांना रूग्णांनी उपाशीपोटी येणे तसेच मागील औषध रिपोर्ट घेऊन येणे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे .नाव नोंदणी साठी ७०५७९००५०३ व ९५५२७९५००५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जामखेड शहरासह तालुक्यातील मुळव्याध आजाराने त्रस्त असलेल्या सर्व लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट ,विष्णू गंभीरे यांनी केले आहे .