सामाजिक, धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असलेले
जामखेड येथील युवा उद्योजक
आकाश दिलीप बाफना यांनी आपली कन्या क्रिशा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त जामखेड निवारा बालगृहातील मुलींच्या निवासासाठी दोन खोल्या बांधून देण्याचा संकल्प केला होता . दि २५ मार्च रोजी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच या पुर्ण बांधकाम झालेल्या खोल्यांचे आकाश बाफना यांनी आपल्या कुटुंबियांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पूर्ण केला. या ठिकाणी वीस मुलींच्या कायमस्वरूपी राहण्याची सोय झालेली आहे.याचवेळी युवा उद्योजक रोशन बाफना व आकाश बाफना यांचा वाढदिवस निवारा बालगृहातील अनाथ मुलांमूलींसोबत साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित एन महेशचे संचालक महेश नगरे, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप बाफना,अभय बाफना ,गौतम बाफना, मिथुन बाफना, अनिल बाफना, कृष्णराव चव्हाण सर, परशुराम भांगे ,अशोक कुमटकर, गणेश भवर, बाळासाहेब नवसरे, यश भंडारी, निलेश देशमुख,दत्तात्रय जगताप व बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचारी वर्ग तसेच सेवा भावी बाफना परिवारातील सर्व महिला वर्ग उपस्थित होत्या. यावेळी आकाश बाफना यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून निवारा बालगृहातील अनाथ गरिब कुटुंबातील २० मुलींच्या राहण्याची सोय केली याबद्दल निवारा बालगृहाचे अध्यक्ष अँड अरुण जाधव यांनी आकाश बाफना व बाफना परिवाराचे विशेष आभार मानले.
आकाश बाफना यांच्या या सामाजिक कामाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन कौतुक केले जात आहे.