जामखेड प्रतिनिधी
गेल्या पाच वर्ष निवडून आल्यापासून आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुंनदाताई पवार ह्या कर्जत जामखेड मतदारसंघात काम करत आहेत. मतदारसंघात महिला बचत गटाचे मोठे जाळे विणले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम त्यांच्याकडून केले जात आहे. मग ते भिमथडी यात्रेत महिलांना स्टॉल उपलब्ध करून देण्यापासून तर त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे असो.
आत्तापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघातील महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज मिळालं, त्यात सुनंदाताई पवार यांचा मोठा वाटा आहे. आजवर बँका या महिला बचत गटांना बिलकूल सहकार्य करत नव्हत्या. आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून त्यातून योग्य मार्ग काढल्यानंतर बँका बचत गटांना कर्ज देऊ लागल्या आणि आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच ३४ कोटी रुपये कर्ज मिळणे ही साधी गोष्ट नाही आणि विशेष म्हणजे या कर्जाची परतफेड करण्याचं प्रमाणही जवळपास ९९ टक्के आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने सर्वच पक्षाच्या प्रचाराने जोर पकडलाय.
आमदार रोहित पवार यांचे जसे सर्व क्षेत्रात काम आहे तसंच सुनंदाताई पवार ह्याही महिला बचत गट, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता, महिलांचं आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम करत आहेत. सुनंदाताई पवार यांनी आता प्रचाराची धुराही खांद्यावर घेतली आहे आणि त्याही गावोगावी जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन आमदार रोहित पवार यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत.
यासोबतच आमदार रोहित पवार यांचे वडिल राजेंद्रदादा पवार, पत्नी सौ.कुंतीताई पवार आणि बहीण सईताई पवार हे सर्वजण सध्या कर्जत जामखेडमध्ये विविध गावांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्ष केलेली विकासकामे आणि कर्जत जामखेडचा बदललेला चेहरा मोहरा याची यानिमित्ताने उजळणी होत असून रोहित पवार यांनी केलेला हा विकास त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केल्याशिवाय राहणार नाही