जामखेड प्रतिनिधी
मी लाडका भाऊ आहे सावत्र नाही त्यामुळे ओवाळणीत मौल्यवान साडीच देणार,सावत्र भावाप्रमाणे छत्री देणार नाही. सुरुवातीला चाँकलेट, बिस्कीट वाटले पाच वर्षे संपत आले की कंपास पेटी अन् त्यात फोटो दिले. अशी टीका आ प्रा.राम शिंदे यांनी नाव न घेता आ रोहित पवार यांच्यावर केली. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीण योजना पात्र व गरजु लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याचे काम करणारया सर्व आधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी, सेविका व मदतनीस, आशा सेविका, समुहबचतगट, सीआरपी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदींचा कौतुक व सन्मान सोहळा माजी मंत्री आ प्रा राम शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आ प्रा राम शिंदे,आशाताई शिंदे, संजीवनीताई पाटील, दिपालीताई गर्जे, संगीताताई पारे,मनिषाताई मोहळकर,वर्षाताई उबाळे, प्रा मधुकर राळेभात, प्रा सचिन गायवळ, डॉ भगवान मुरुमकर, अजय काशीद, शदर कारले, नगरसेवक मोहन पवार, पवन राळेभात, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, रवि सुरवसे, बाजीराव गोपाळघरे, सोमनाथ पाचरणे, गोरख घनवट, डॉ अल्ताफ शेख, महारूद्र महारनवर, नानासाहेब गोपाळघरे, उध्दव हुलगुंडे,अजय सातव, महालिंग कोरे, संजय काशीद, गौतम उतेकर, शाकीर खान, तात्याराम पोकळे, पप्पु कात्रजकर सुनील यादव यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका समुह बचत गट सीआरपी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पूढे बोलताना आ राम शिंदे म्हणाले की
मतदारसंघातील गावागावात जाऊन भेटी घेतल्या मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मी खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मनात ठेवा झाकली मूठ सव्वा लाखाची,योग्यवेळी आपण मला सहकार्य द्या असे आवाहन त्यांनी केले.
शासनाची कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी तळागाळापर्यंत मोलाचे काम करणाऱ्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे.
महिलांचा मान सन्मान वाढण्यासाठी त्यांच्या हातात पैसा आला पाहिजे. त्यासाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला १५ कोटींपेक्षा जास्त रक्कम जामखेड तालुक्याला येतात. मी आमदार मंत्री असतांना प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच मला पुन्हा विधानपरिषदेत आमदारकी मिळाली.
यावेळी प्रशासनातील महिला भगीनींचा सन्मान केला त्यामुळे तहसीलदार माळी यांनी मनोगत व्यक्त करताना तालुका प्रशासनाच्या वतीने सरकारचे प्रतिनिधी म्हणून आ प्रा.राम शिंदे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रा मधुकर राळेभात यांनीही मनोगत व्यक्त केले.
————–चौकट
खबरदारी घ्यावी :- डॉ भगवान मुरुमकर
————-
आ राम शिंदे दाहा वर्षे आमदार पाच वर्षे मंत्री राहिले. मी दोन टर्म सभापती राहिलो कधीही कोणत्याही आधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास झाला नाही.
यावेळी समोरचे पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात. त्यामुळे खबरदारी घ्या आणि आपल्याच माणसाला साथ द्या अन्यथा पुढची वीस वर्षे कोणीही तयार होणार नाहीत.आपला माणुस ओळख असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांनी केले.