जामखेड प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज संस्था खोंदला ता.कळंब जि.धाराशिव यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त २५फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित ” मी ज्ञानी होणार” या सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय स्पर्धा जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील जिप शाळेतील कु.अमृता कल्याण चौधरी (इ. ७वी ) या विद्यार्थीनीने ५० पैकी ५० गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर दिक्षा तानाजी ढाळे ४३,समृद्धी राजेंद्र ढाळे ४१,संकेत बाजीराव पठारे ४१,सुमीत गोपीनाथ ढाळे ३८ व गणेश केशव जायभाय ३३ गुण घेऊन चमकदार कामगिरी केली आहे.अमृता चौधरीसह सर्व गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी विशेष कौतुक केले.यावेळी खर्डा बीट विस्तारअधिकारी संजय नरवडे,नान्नज बीट विस्तारअधिकारी सुनील जाधव, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे सर,सचिव गणेश नागरगोजे सर,तेलंगशी सरपंच कविता ढाळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय यांच्यासह पालक व ग्रामस्थ यांनीही गुणवंतांचे विशेष अभिनंदन केले आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक आनंद राऊत ,आनंता गायकवाड,संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले,विजयकुमार रेणुके,लक्ष्मी जायभाय ,अशोक जाधव व रविंद्र धस यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.