जामखेड प्रतिनिधी
अकलूज तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर साहित्य जप्त करून गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला.
मात्र आता मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील अभिरूप मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून पोलिसांच्या गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यानंतर मतदान प्रक्रियेतून माघार घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांबरोबर आमदार उत्तम जानकर यांनी चर्चा केली असून पोलिसांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर यांनी मतदारांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला आहे. लोकशाहीमध्ये असलेल्या शंका दूर करणे प्रशासनाचे काम आहे मात्र लोकशाहीचा बाणेदारपणा जपणारांना सहकार्य करण्याऐवजी कारवाईची धमकी देणे म्हणजे मारकडवाडीत प्रशासनाची लोकशाहीविरोधी भुमिका असल्याची टिकात्मक चर्चा राज्यात ऐकायला मिळत आहे.