Homeआरोग्यमाजी मंत्री राम शिंदेंच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल: नोकरीच्या आमिषाने उकळले पैसे

माजी मंत्री राम शिंदेंच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल: नोकरीच्या आमिषाने उकळले पैसे

जामखेड प्रतिनिधी

माजी पालकमंत्री व तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या सचिवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उशीरा का होईना गून्हा दाखल झाला यामुळे आ राम शिंदे यांच्या नावाखाली उखळ पांढरे करून घेणारयांचे धाबे दणाणले आहेत .मनोज राधाकृष्ण कोकाटे (भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर) असे या सचिवाचे नाव आहे.
तलाठ्याची नोकरी लावून देतो असे सांगत त्याने २०१६ मध्ये मुंबईतील युवकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. सुमित बबन डबे (रा. सायन, बृहन्मुंबई) असे फिर्यादीचे नाव असून माटुंगा पोलिस ठाण्यात मनोज विरोधात गुन्हा दाखल झालाय.

अधिक माहिती अशी : डबे हे एक व्यावसायिक असून ते लहान मुलांचे कपडे विकत असतात. एकदा पुण्यात कोकाटेसोबत त्यांची ओळख झाली. त्याने त्यांना माझ्या साहेबांना सांगून तुला तलाठ्याची नोकरी मिळवून देतो असे सांगितले.
तसेच त्यासाठी ५ लाख रुपयांची डिमांड केली. डबे यांनी त्याला त्यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०१६ मध्ये धनादेश व रोकडमध्ये ५ लाख रुपये दिले होते. परंतु या घटनेला सहा महिने झाले तरी नोकरी लागेना हे लक्षात आल्यावर डबे यांनी कोकाटेकडे पैसे परत मागितले.
कोकाटेने त्यांना एक नम्बर दिला व ते पैसे परत देतील, असे सांगितले. तब्बल सहा-सात वर्षे पाठपुरावा करुनही डबे यांना पैसे परत न मिळाल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अखेर डबे यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास माटुंगा पोलिस करत आहेत. आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचाही पोलीस तपास करीत आहेत .

——चौकट —
राम शिंदेंच्या नावाखाली अनेक झाले गब्बर
——————
आ. प्रा राम शिंदे हे मंत्री असतांना मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यातील अनेक जणांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रा .राम शिंदे यांच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. यातील अनेक जण “कामापुरता मामा” या प्रमाणे आ. प्रा राम शिंदे यांच्याशी प्रामाणिक राहिले नाहीत .नंतर पुलाखालून खुप पाणी गेले अन् आत्ता त्यातील अनेक जण घरवापसीच्या वाटेवर आहेत.या सचिवावर गुन्हा दाखल केला त्याप्रमाणे मतदारसंघातील आ राम शिंदे यांच्या जवळच्या लोकांकडून ज्या लोकांची अडवणूक फसवणूक झाली आहे ते पुढे येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!