जामखेड प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांकडून सगळ्याची दखल व काळजी घेतली जात आहे. नूकतेच
सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे यूवा नेतृत्व माजी सरपंच गफारभाई पठाण यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे माजी मंत्री आ प्रा राम शिंदे व अल्पसंख्यकचे जिल्हाध्यक्ष तैय्यब भाई बेग यांनी निवड केली असून या निवडीचे आ प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.यावेळी गफारभाई पठाण म्हणाले की जामखेड कर्जत मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज हा आ प्रा राम शिंदे यांना मानणारा आहे. पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेऊन अल्पसंख्यांक समाजातील अडी अडचणी सोडवण्यासाठी काम करणारा असून पक्ष वाढीसाठी मोठे संघटन करणार आहे. असेही नवनियुक्त अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष गफारभाई पठाण यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परीषद सदस्य अशोक खेडकर, काकासाहेब धांडे, भिमराव गायकवाड,भागवत जगदाळे महाराज, बाबासाहेब बामणे, पाटोदा येथील खालेद पठाण ,सिद्दीक शेख मुजाहीद पठाण, रमजान सय्यद, आरबाज सय्यद, आनिस पठाण,जैद पठाण आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल रत्नदीप मेडिकल कॉलेजचे डॉ भास्कर मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ, मा सभापती भगवान मुरुमकर, मार्केट सभापती शरद कारले, अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष जमीर बारूद, शहराध्यक्ष प्रा.जाकीर शेख आदींनी गफ्फार भाई पठाण यांचे अभिनंदन केले.