Homeव्हिडिओ बातम्याबाप लेकांनी एकाच दोरीने घेतला गळफास  इथे आश्वासनं मुबलक मिळतात... मरण...

बाप लेकांनी एकाच दोरीने घेतला गळफास  इथे आश्वासनं मुबलक मिळतात… मरण स्वस्त झालंय!

जामखेड प्रतिनिधी

काळजाला पिळवटून टाकणारी घटना.नांदेड जिल्ह्यातील मिनकी ता बिलोली येथे घडली आहे.

उदगीर येथील एका शाळेत दहावी वर्गात शिकणारा ओमकार लक्षण पैलवार नावाचा १६ वर्षाचा मुलगा संक्रांत निमित्त गावी (मिनकी) आला. घरी येऊन सणानिमित्त नवीन कपडे आणि शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची वडिलांकडे मागणी केला. वडील राजेंद्र पैलवार यांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, पैसे आले की तुला नवीन कपडे आणि पुस्तक वह्या घेऊन देईन असे सांगितले.

पण मुलाच्या मनात कसले विचार आले त्यालाच ठाऊक. तो सकाळी उठला सरळ शेतात गेला आणि गळफास लावून स्वतःला तिथेच संपवून घेतला.

मुलगा (ओमकार) घरी आला नाही म्हणून आई वडील भाऊ सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत वडील शेताकडे आले, पाहतो तर मुलगा झाडाच्या फांदीवर लटकत होता. मुलगा फाशी घेतल्याची कसलीच माहिती घरच्यांना न देता वडील लगेच झाडावर चढले, मृतदेहाला अलगद खाली सोडून, त्याला जागेवर झोपवले आणि मुलगा ज्या दोरीने फाशी घेतला त्याच दोरीने त्याच झाडावर त्याच क्षणी वडीलही फाशी घेऊन त्याच झाडाखाली स्वतःचे जीवन संपवल्याची दूर्दैवी काळजाला पिळवटुन टाकणारी घटना घडली. हे इतकं वेदनादायी चित्र आहे की यावर कोणत्या शब्दात व्यक्त व्हावं हे कळत नाही.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!