जामखेड प्रतिनिधी
आता ग्रामीण भागातही एच यू गुगळे पतसंस्थेच्या फँमिली फंडाला मोठी पसंती मिळत आहे.
जामखेड तालुक्यातील माळवाडी, जातेगाव, दिघोळ, परकडवस्ती, लोणी, धनेगाव या ठिकाण जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय धूमाळ व वैभव डिसले यांनी फँमिली फंडाची सविस्तर माहिती मुलांना व शिक्षकांना दिली. पहिल्याच दिवशी ६० खाते उघडले गेले तर खाते उघडण्यासाठी शेकडो अर्ज भरले गेले. आवश्यक कागदपत्रे घेऊन तेही खाते कार्यान्वित होणार आहेत असे एच यू गुगळे पतसंस्थेचे जूबेर पठाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे विजय धूमाळ वैभव डिसले यांनी “फँमिली फंड” नकळत बचत योजनेचे महत्त्व शालेय मुलांना आपल्या खास शैलीत सविस्तर समजावून सांगितले. वडीलधारी मंडळी व पाहूणे मुलांना खाऊसाठी पैसे देतात. त्या पैशाचा पूर्ण खाऊ न खाता बचत कशी करायची, त्या बचतीचे पुढे कशासाठी उपयोग होतो याबाबत शिक्षक मूलं मूली यांना सविस्तर माहिती दिली. तालुक्यातील दिघोळ, माळेवाडी, जातेगाव, धनेगाव, परकडवस्ती, लोणी या ठिकाणच्या शाळेतील इयत्ता १ली ते ४थी तसेच ५वी ते ७वी या वर्गातील मुलांचा प्रतिसाद पहाता तालुक्यातील प्रत्येक शाळेत जाऊन “फँमिली फंड “नकळत होणारया बचतीचे महत्त्व सांगणार आहे असे विजय धूमाळ यांनी सांगितले.