Homeव्हिडिओ बातम्याएच यू गुगळे पतसंस्थेच्या फँमिली फंडमुळे बचत बरोबरच स्वकष्टाचं महत्त्व मूलांना पटू...

एच यू गुगळे पतसंस्थेच्या फँमिली फंडमुळे बचत बरोबरच स्वकष्टाचं महत्त्व मूलांना पटू लागलय

एच यू गुगळे पतसंस्थेच्या फँमिली फंड न कळत बचत या योजनेची शहरी, ग्रामीण भागात मूलांना चांगलीच ओळख झाली आहे. मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणच्या शाळेतील मूलांनी बचत खाते उघडले आहेत. अनेक मुलं स्वतः बँकेत येऊन पैसे भरना करतांना दिसतात. अशाच प्रकारे दि १५ एप्रिल रोजी सोहम मनोज भोरे या मूलांने स्वतःच्या बचत खात्यामध्ये ६४१ रूपये स्वतः पावती लिहुन पैसे भरणा केले. विशेष म्हणजे या मूलाने शाळा सूटल्यानंतर दरम्यानच्या काळात चिंचा फोडण्याचे काम केले. त्या कामाचे आलेले पैसे बचत खात्यात भरले.

सदर सोहम मनोज भोरे हा लहान मूलगा पैसे घेऊन बँकेत आला असता बँकेच्या स्टाफने त्याला मदत करण्यास पूढे आले मात्र सोहम भोरे याने स्वतः पैसे भरना स्लिप भरली व पैसे खात्यात जमा केले. तसेच सदर पैसे मी स्वतः चिंचा फोडण्याचे काम करून जमा केले आहेत असे त्याने सांगितले.

 

 

सोहम मनोज भोरे याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे मात्र वेळेचा सदुपयोग व बचत या बाबीं महत्त्वच्या आहेत हे जाणवलं. यावरून एच यू गुगळे पतसंस्थेच्या “फँमिली फंड एक न कळत बचत” या योजनेमुळे शालेय मूलांना बचत बरोबरच स्वकष्टाच्या पैशाला महत्त्व असते हे लहान मुलांना उमगत असल्याचे दिसून येत आहे. आणि बचत करत आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळत आहे. या सोहम मनोज भोरे यांचे एच.यु गुगळे पतसंस्था व पालकवर्गातुन कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!