जामखेड प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघात पक्षप्रवेशाचा जोरदार धडका सुरू आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या पुढाकाराने सोनेगाव व परिसरातील २२२ जणांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री आ प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गेल्या पाच वर्षातील ६ गावातुन सर्वात मोठा पक्षप्रवेश कार्यक्रम सोनेगाव येथे पार पडला!
सोनेगाव आणि परीसरातील २२२ रोहीत पवार समर्थकांनी,
*भुमिपुत्र आ प्रा राम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टित जाहीरपणे प्रवेश केला!
यामध्ये अनेक ग्रा पं सदस्य,उप सरपंच,सरपंच आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता,
रोहीत पवारांसाठी खर्डा गटात हा खुप मोठा धक्का आहे,
सोनेगावचे भुमिपुत्र प्रा सचिन सर गायवळ यांनी कर्जत-जामखेडच्या भुमिपुत्रासाठी आणि भुमिपुत्राच्या माध्यमातुन कर्जत-जामखेडच्या भुमिपुत्रांसाठी फायदा व्हावा या उद्देशाने पुढाकार घेत हा पक्षप्रवेश घडवुन आणला
आ,प्रा राम शिंदे यांच्या विजयाचं लीड वाढण्यासाठी खर्डा गटातुन प्रा सचिन सर गायवळ मेहनत घेत आहेत, भुमीपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांचा विजय निश्चित झाला असला तरी हुकुमशाही विचाराच्या मानसिकतेच्या आहारी गेलेल्या युवावर्गाला निवडणुकीपुर्वीचं स्वाभिमानी विचारधारेत सामील करून त्यांच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी स्वभिमानी विचारधारेशी जोडण्याचं काम प्रा सचिन सर गायवळ करत आहेतं!