सोनेगाव, तरडगाव, वंजारवाडी, दौंडवाडी व पोतेवाडी सरपंचांचा अनोखा उपक्रम
जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत . वाढदिवसाच्या निमित्ताने सोनेगावचे सरपंच डॉ विशाल वायकर यांनी ५१ विहिरी, तरडगाव दौंडवाडी वंजारवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. जयराम खोत यांनी ५१ विहिरी तसेच पोतेवाडीचे सरपंच प्रवीण पोते यांनी ३० विहिरी अशा प्रकारे एकूण १३२ शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीचे वाटप करण्यात आले .एकूण ५ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा सचिन गायवळ यांनी वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने वेगळा सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे.जामखेड तालुक्यात दरवर्षी २८ जानेवारी रोजी प्रा सचिन गायवळ सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यामध्ये विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,हॉस्पिटलमध्ये फळे वाटप, तसेच आरोग्य शिबिर त्याचबरोबर अनेक ठिकाणी डिजिटल बोर्डद्वारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कार्यकर्ते व्यक्त करीत असतात.यावर्षी सोनेगावचे सरपंच डॉ. विशाल वायकर तडगाव, दौंडवाडी, वंजारवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. जयराम खोत व पोतेवाडीचे सरपंच प्रवीण पोते यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपापल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीचे अनुदान मिळविण्यासाठी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता पंचायत समिती कार्यालयाकडे केली आहे.त्याचबरोबर या तिन्ही सरपंचांचे विविध ठिकाणी व समाजामध्ये अभिनंदन करण्यात येत आहे.