पोलिस रेझिग डे सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शन
जामखेड प्रतिनिधी
पोलीस रेझींग डे सप्ताह अनुषंगाने पोलीस स्टेशनकडुन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने दि ३ जानेवारी रोजी ल.ना. होशिग विद्यालयात पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस दला बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तसेच पोलिस दलाचा चालणारे कामकाजाचे महत्त्व डायल 112 , ट्रॉफिक नियम,चाईल्ड लाईन , पोलिस दलाचे दैनंदिन थोडक्यात सांगितले तसेच पोहेकॉ प्रवीण इंगळे ,पोना.अविनाश ढेरे , पोकॉ प्रकाश जाधव यांनी विद्यार्थी यांना शास्त्र बाबत माहिती दिली आहे .या वेळी ल. ना.हिशिंग विद्यालय चे मुख्याध्यापक बी. ए.पारखे , उप मुख्यद्यापाक गायकवाड परवेक्षक राजमाने,ncc प्रमुख देडे सर,राऊत सर तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच 200 ते 250 विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.