जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत लक्ष वेधणारया मतदार संघांपैकी कर्जत जामखेड मतदार हा एक मतदारसंघ होय.
अखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अतितटीच्या झालेल्या निवडणुकीत आ रोहित पवार यांना १२४३मतांनी विजयी घोषित करण्यात आले .
शेवटच्या फेरीपर्यंत आ रोहित पवार व आ प्रा राम शिंदे यांच्याच काही शेकडा मतांचाच फरक दिसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आ प्रा.राम शिंदे यांना १२६४३३ तर आ रोहित पवार यांना १२७६७६ मते पडली. यामध्ये अवघ्या १२४३ मतांनी आ प्रा राम शिंदे यांचा पराभव झाला तर रोहित पवार विजयी झाले. सर्व मतमोजणी पुर्ण झाली. एका फेरीची आ प्रा राम शिंदे यांच्या मागणीनुसार फेरमतमोजणी झाली मात्र आ प्रा राम शिंदे झाली तेव्हा निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. दरम्यान राज्यभरातील लोकांचे या निकालाकडे लक्ष वेधले गेले होते. शेवटी जामखेड कर्जतच्या नशीबात पून्हा दोन दोन आमदार आले आहेत