जामखेड प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती जामखेड तालुक्यातील जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी येथे ३१ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे .
या जयंती उत्सव कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , ना रामदास आठवले ,लोकनेत्या पंकजाताई मुंडे, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, जामखेडचे सुपुत्र प्रा. सचिन गायवळ यांनी केले आहे.