Homeव्हिडिओ बातम्यापहिल्याच सभेत बदल्याची भावना: आधिकारयांचाही अपमान: प्रा सचिन...

पहिल्याच सभेत बदल्याची भावना: आधिकारयांचाही अपमान: प्रा सचिन गायवळ यांनी आ रोहित पवारांच्या भाषणाचा घेतला समाचार

जामखेड प्रतिनिधी

कर्जत-जामखेड विधानसभा २०२४ ची निवडणुक ही फक्त विकासावरच राहीली नसुन भुमिपुत्रांचा स्वभिमान विरूद्ध परक्यांची हुकुमशाही,दडपशाही इथपर्यंत पोहचली आहे,
उपऱ्यांकडुन होत असलेली मनमानी,दडपशाही,जाहीरातीतुन होत असलेला विकास याविरोधात ही लढाई आहे असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री आ प्रा राम शिंदे व आ रोहित पवार यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आ रोहित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत केलेल्या भाषणातील काही मूद्यांचा सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी परखड शब्दात समाचार घेतला. प्रा सचिन गायवळ म्हणाले की आ रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर
पहील्याच सभेत बोलतांना कर्जत-जामखेडच्या जनतेच्या विरोधात बदल्याची भावना आ रोहित पवार यांनी उघड बोलुन दाखवली.तसेच अधिकाऱ्यांनाही अपमानित करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे,आज विरोधकांविषयी बोललं जातयं पण ज्याप्रमाणे नाकात पाणी जायला लागल्यावर माकड पिल्लालाही पायाखाली घेत त्याप्रमाणे आज सोबत आहेत त्यांनाही उद्या स्वार्थासाठी पायदळी तुडवलं जाईल अशीच अवस्था आहे,आणि यापुर्वीही प्रत्यक्षात अनुभवही आलेला आहे,
जबाबदार लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना धमकावत असताना,मी साधुसंत नाही म्हणत कर्जत-जामखेडकरांविषयी अर्वाच्च भाषेत बदला घेणार असल्याचं बोलुन दाखवत असताना अतिक्रमणीय उमेदवाराला मात्र गुदगुल्या होत होत्या ! विविध मूद्यावर परखड मत व्यक्त करतांना उपऱ्यांकडुन होत असलेली मनमानी,दडपशाही,जाहीरातीतुन होत असलेला विकास या गोष्टीचा सर्वसामान्य स्वाभिमानी कर्जत-जामखेडकरांनी नक्कीच विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!