दिघोळ माजी सरपंच रंजना दगडे यांचे दुःखद निधन
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील दिघोळ ग्रामपंचायतच्या माजी सरपंच रंजना पिराजी दगडे (वय ४५)यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांत पूणे येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दि २५ मार्च रोजी दवाखान्यात निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मूलं, एक मूलगी, आहेत.मयत रंजना पिराजी दगडे यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार बुधवार दि २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिघोळ या गावी होणार आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215