Homeव्हिडिओ बातम्याडोणगाव तरूणांचा आ प्रा राम शिंदेंकडे ओंढा ५० युवकांचा भाजपात...

डोणगाव तरूणांचा आ प्रा राम शिंदेंकडे ओंढा ५० युवकांचा भाजपात प्रवेश !

जामखेड प्रतिनिधी

: रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराला कंटाळून जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील ५० युवकांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. ऐन दिवाळीत जामखेड तालुक्यातील डोणगावमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्यामुळे रोहित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार व मंत्री असताना केलेल्या कामांवर प्रभावित होऊन तसेच कर्जत जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानाच्या लढ्याला बळ देण्यासाठी डोणगावमधील ५० प्रभावशाली युवकांनी मंगळवारी मध्यरात्री आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला.

यावेळी भाजपा नेते संजय काका काशिद, जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अनिल गदादे, शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजिरे, लहू शिंदे, महारूद्र महारनवर, सुनिल यादव, संतोष गव्हाळे, माजी सरपंच दत्तात्रय भागवत, माजी उपसरपंच अजित यादव, राम पवळ, रामेश्वर यादव मेजर, पोपट जमदाडे, प्रशांत साळवान, डाॅ गणेश यादव, वैभव यादव, युवराज धनवे, बाळासाहेब पवळ, सुजित धनवे, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवारांच्या मनमानी व गंडवागंडवीच्या कारभाराला कंटाळून डोणगाव येथील सतीश डोंगरे, पांडुरंग पोठरे, मनोज यादव, प्रकाश वारे, राम पोठरे, सचिन पोठरे, देवा मोरे, बारकु धनवे, सचिन सातव, संदीप सातव, प्रकाश यादव, तुषार मुळे, निलेश वारे, सतीश मोरे, हनुमंत मोरे, सुमित धनवे, अमोल उघडे, रामेश्वर यादव, युवराज धनवे, हनुमंत मोरे, सागर मोरे, हनुमंत यादव, नवनाथ भागवत, खंडू मोरे, तात्यासाहेब यादव, गणेश यादव, हनुमंत हौसराव यादव,गहिनीनाथ मुळे, शरद साळवान, अशोक यादव, तुषार यादव, ओम सुतार, शंकर यादव, गणेश नन्नवरे, सुरेश वाघमारे, सुशांत सातव, आकाश यादव, मुन्ना मोरे, सागर मोरे या युवकांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. डोणगावमधील युवकांनी घेतलेल्या या राजकीय निर्णयामुळे राष्ट्रवादीला डोणगावमध्ये मोठे भगदाड पडले आहे

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!