जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आध्यात्मिक व इतर चालू घडामोडींच्या विषयातील ज्ञान मिळवण्यासाठी वाचन वाढवले पाहिजे.त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल त्यामुळे आदर्श विद्यार्थी, आदर्श नागरिक तयार होतील .तसेच एड्सवर उपाय,काळजी घेणे हाच महत्त्वाचा भाग आहे.असे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी एड्स दिनानिमित्ताने मार्गदर्शन करतांना सांगितले.
जामखेड येथील ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर ‘ जागतिक एड्स दिन ‘ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लना होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे,प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ मोराळे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल बोराडे ,डॉक्टर जाधवर साहेब समन्वयक डॉ श्याम जाधवर , श्रीमती कांबळे मॅडम, युवराज भोसले, पांडुरंग वराट,विश्वनाथ आघाव सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या संकल्पनेतून युवकांमध्ये म्हणजेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एच आय व्ही याबद्दल माहिती व्हावी व जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ सुनील बोराडे यांनी एचआयव्ही यावरील उपाय योजना व त्याबद्दलचे समज गैरसमज याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर श्रीमती कांबळे मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये एड्स बद्दल जनजागृती कॉलेजमधील म्हणजेच महाविद्यालयीन युवकांना याची जास्त गरज आहे.आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापकांचे धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांसमोर पोस्टर्स, पथनाट्यद्वारे एड्स बद्दल जनजागृती केली.यावेळी सुत्रसंचालन प्राध्यापिका प्रमिला पोकळे मॅडम यांनी तर आभार प्रा. नवनाथ ढेरे यांनी मानले.