तहसीलदारांना दिले निवेदन
जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्यावर झालेल्या ई. डी. च्या कारवाईचा जामखेड मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला .याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल गिरमे ,बीलाल शेख गणेश बाधवन अल्ताफ शेख लक्ष्मण जाधव
रामनाथ जाधव
निवेदनात म्हटले आहे की
कर्जत-जामखेड विधान सभेचे आ. रोहित पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने ई. डी. ची कारवाई करण्यात येत आहे याकारवाईचा आम्ही कर्जत-जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीने निषेध नोंदवीत आहे.