Homeव्हिडिओ बातम्याजामखेड तालुक्यातून २०० स्वयंसेवक रवाना:

जामखेड तालुक्यातून २०० स्वयंसेवक रवाना:

जामखेड प्रतिनिधी

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागील तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती त्या हाकेला प्रतिसाद देत संपुर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने झाली. मात्र तरी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. या अनुशंगाने सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी लाखो समाज बांधवांच्यासह मुंबईकडे कुच केली आहे. कालचा मुक्काम मातोरी येथे होता तर आजचा मुक्काम नगर जिल्ह्यातील बाराबाभळी याठिकाणी होत आहे. या ठिकाणी लाखो मराठा बांधव मुक्कामासाठी थांबणार आहेत. याच पाश्र्वभूमीवर जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबई मोर्चासाठी मदतीची हाक दिली होती त्यास तालुक्यातील सर्व बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणावर कोरडा शिधा, भाकरी, ठेचा, लोणचे, चिवडा, लाडु, रेवडी फुटाणे यासह पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स अशा स्वरूपात मदत केली.

आज दि २१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर मराठा बांधव आंदोलकांनसाठी विविध कोरडा शिधा घेऊन येत होते. प्रत्येक माऊली आपल्या लेकराच्या आरक्षणासाठी आज सकाळपासूनच भाकरीची शिदोरी बांधुन देत होती. तसेच काही चिमुकल्यांनी तर आपल्या खाऊच्या साठवलेल्या पैशातून लाडु चिवडा खरेदी केला व जरांगे पाटील यांच्या पर्यंत पोहच करा अशी विनवणी स्वयंसेवकांना केली.

मुस्लिम पंच कमीटीच्या वतीने पिण्याचे बाॅक्स देण्यात आले व तालुक्यात सर्व मुस्लिम बांधवांचा मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच गरज भासली तर आझाद मैदानावर मुस्लिम समाजही उपोषण करणार आल्याचे पंच कमीटीच्या सदस्यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील आनेक गावातील समाज बांधव गाड्यांच्या ताफ्यांसह व डि जे सह शहरात दाखल होत होते. जुन्या तहसील कार्यालया पासुन ते खर्डा चौक बस स्थानक ते नगररोड कोठारी पेट्रोल पंपा पर्यंन्त डी जे सह वाजत गाजत मराठा बांधवांनी भव्य आशी रॅली काढली होती. यानंतर दोनशे स्वयंसेवक व जामखेड तालुक्यातील हजारो मराठा आंदोलक हे कोरडा शिधा व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन आनेक वहानानमधुन मनोज जरांगे पाटील यांच्या अहमदनगर येथील मोर्चात सायंकाळी सहभागी होण्यासाठी रवाना झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनाला जामखेड तालुक्यातील सर्व समाज्यातील बांधवांनी प्रतिसाद देत मदत केली त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा जामखेडचे अवधूत पवार यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!