Homeव्हिडिओ बातम्याजामखेडला अमरधाम परिसरात वृध्दाचा मृतदेह आढळून आला

जामखेडला अमरधाम परिसरात वृध्दाचा मृतदेह आढळून आला

जामखेड प्रतिनिधी

 

जामखेड शहरातील अमरधाम परिसरातील विटभट्टीजवळ एका ६० वर्षे वयाच्या वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे.

अंबादास रामभाऊ काळे, वय ६० वर्षे रा. संताजीनगर, जामखेड असे मृतदेह सापडलेल्या वृध्द इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील अमरधाम येथील विटभट्टीच्या जवळील शेतात एका वृद्ध इसमाचा मृतदेह पडलेला होता. दि २४ रोजी दुपारी एक मुलगा या परीसरात आला असता त्याला सदरचा मृतदेह दिसुन आला.

त्यांनी त्याची पहाणी केली. तसेच हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेण्यासाठी सोशल मिडीयावर याबाबत ची माहिती टाकली.यानंतर शहरातील संताजी नगर भागातील एक वृद्ध इसम

देखील चार पाच दिवसांपासून आपल्या घरातुन

बेपत्ता झाला होता.

त्यामुळे नातेवाईकांनी अमरधाम परीसरातील त्या ठिकाणी जाऊन पहाणी असता सदराच्या मृतदेहाची ओळख पटली.

मात्र संताजीनगर भागातून सदरचे वृध्द अमरधाम परीसरात कसे आले व मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजु शकले नाही. याबाबत

जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पूढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!