Homeव्हिडिओ बातम्याजामखेडमध्ये परप्रांतीय कामगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न  जामखेड पोलिसांनी...

जामखेडमध्ये परप्रांतीय कामगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न  जामखेड पोलिसांनी तीघांना केले अटक 

जामखेडमध्ये परप्रांतीय कामगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न 

जामखेड पोलिसांनी तीघांना केले अटक

जामखेड प्रतिनिधी

याचा पाय तोडा जेणेकरुन हा काम करणार नाही व कारखान बंद पडेल असे म्हणत परप्रांतीय कामगाराला जबर मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी तीनही आरोपींना तातडीने अटक केली आहे.

पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत  विजय ओमप्रकाश चौरासिया वय-३२ वर्ष धंदा-मजुरी रा. पडरोना जिल्हा कुसीनगर (राज्य उत्तरप्रदेश) हल्ली रा. खर्डा रोड महावीर बर्फ कारखाना जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी म्हटले आहे की ते सुमारे ८ वर्षापासुन दिलीप फुलचंद गांधी यांच्या महावीर बर्फ कारखान्यामध्ये कामाला आहे.

दि ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. सुमा. बर्फ कारखान्यामध्ये एकटाच काम करत असताना सुरेश आप्पा क्षीरसागर, शुभम अमृत पिंपळे दोघे रा. आरोळे वस्ती. मनोज सुरेश जगताप रा. म्हाडा कॉलनी जामखेड

या तिघांनी काही एक कारण न सांगता शिवीगाळ करुन त्यांचे हातातील दगडाने माझे पायाच्या नढगीवर व डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करु लागले. यावेळी सुरेश आप्पा क्षीरसागर हे म्हणत होता की याचा पाय तोडा जेणेकरुन हा काम करणार नाही व कारखाना बंद पडेल असे म्हणुन वरिल तिघांनी माझे डोक्यास मागील बाजुस व डाव्या पायाचे नढगीवर दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.

मारहाण करतांना मोठमोठ्याने ओरडत असल्याने तेथे जवळ असलेले साई ट्रन्सफॉर्म या दुकानातील मॅनेजर महेश कसबे व अरुण देवकाते यांनी मला वाचविण्यासाठी त्या तिघांवर प्रतिदगड फेक केली तेव्हा आरोपी तेथुन पळुन गेले त्यानंतर महेश कसबे यांनी दिलीप फुलचंद गांधी यांना सदरचा प्रकार सांगितला.

त्यानंतर समर्थ हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले.

 

. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!