जिवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. मोठे ध्येय ठेवा. कायम चांगल्यांची संगत ठेवा, निर्व्यसनी रहा, जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत घ्या व ध्येयाचा ध्यास घेतला तर आपले जिवन सुखकर होऊन तुम्ही जिवनात निश्चित यशस्वी व्हाल.असे सनराईज एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष डॉ संजय भोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले .जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फौंडेशन शैक्षणिक संकुलाचे स्व.एम.ई. भोरे ज्युनिअर कॉलेज व संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज अंतर्गत असलेल्या कला व विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या मुलांचा निरोप समारंभ मेळावा दि. १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉ संजय भोरे बोलत होते .
कॉलेजच्या भव्य दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून कॉलेजच्या प्राचार्या तथा संस्थेच्या सचिव श्रीमती अस्मिता जोगदंड (भोरे) होत्या .यावेळी प्रा. तेजस भोरे, प्रा. कसाब, प्रा. भोंडवे, प्रा. मोहिते, प्रा.कदम, प्रा.पवार मॅडम, अविनाश भोरे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्या श्रीमती जोगदंड मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विनोद बहीर, नारायण आयकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचा विद्यार्थी सुजित नवसरे तर आभार प्रा. मोहिते यांनी केले .
चांगली संगत, आत्मविश्वास, मेहनत यशाची सुत्रे :- डॉ संजय भोरे
RELATED ARTICLES