ग्रामविकास निधी खर्च करण्याच्या “वंजारवाडी पॅटर्न” ची मतदारसंघात चर्चा!
महादेव ओंबासेचे आदर्शवत कार्य
जामखेड येथील
ग्रामीण भागात विकासकामं होत असताना कामात भ्रष्टाचार होणं,काम नित्कृष्ट दर्जाचं होणं या गोष्टी वारंवार बघायला मिळतात मात्र वंजारवाडी ग्रामस्थांनी केलेल्या नवीन प्रयोगामुळे कुठलाही भ्रष्टाचार न होता अत्यंत चांगल आणि जास्तीच काम झाले. उत्तम दर्जाचे काम झाल्याने वंजारवाडी ग्रामस्थही कामावर समाधानी आहेत.
तसेच विकासकामे करताना *वंजारवाडी पॅटर्न* सर्वत्र राबवला जावा अशी चर्चा आसपासच्या परीसरात आणि मतदारसंघात होत आहे.
भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महादेव ओंबासे यांनी वंजारवाडी ग्रामस्थांना एकत्रित करून गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देऊन नीधीपेक्षा जास्तीचे उत्तम दर्जाचे काम करत राजकीय कार्यकर्त्यांपुढे नवीन आदर्श ठेवला आहे.
वंजारवाडी गावचे नेतृत्व,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महादेव ओंबासे यांनी गावात नवीन बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यासाठी आ प्रा राम शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे नीधीची मागणी केली होती आ प्रा राम शिंदे यांनी पत्राची दखल घेत ग्रामविकास व पंचायत राज विभाग गाव अंतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा योजनेतुन ८ लाख रूपयाचा निधी मंजुर करून दिला.
नेत्याने मंजुर केलेले काम कार्यकर्तेच करतात असे अनेकवेळा बघायला मिळते पण महादेव ओंबासे मात्र अपवाद ठरले आहेत. नीधीचा वापर योग्यप्रकारे व्हावा. काम चांगल्या प्रतीच व्हावे यासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता नीधी खर्च करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकत्रित घेतला.
गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करत असताना मंजुर झालेला सर्व निधी कामासाठीच वापरला. ईस्टिमेट पेक्षा जास्त खर्च झाला.
यावेळी वंजारवाडी ग्रामस्थांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती नामदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले.
—-….
गावाच्या विकासकामांसाठी आलेला नीधी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विश्वासाने काम केल्याने काम जास्त प्रमाणात होऊन उत्तम दर्जाचे झाले आहे असे भाजपा युवा मोर्चाचे तालूका उपाध्यक्ष महादेव ओंबासे यांनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215