Homeव्हिडिओ बातम्यागुलालाची उधळण ; भर पावसात आमदार रोहित पवारांसह कार्यकर्ते उत्साहात आमदार...

गुलालाची उधळण ; भर पावसात आमदार रोहित पवारांसह कार्यकर्ते उत्साहात आमदार रोहित पवारांची भव्य मिरवणूक

गुलालाची उधळण ; भर पावसात आमदार रोहित पवारांसह कार्यकर्ते उत्साहात

आमदार रोहित पवारांची भव्य मिरवणूक
जामखेड प्रतिनिधी

आमदार रोहित पवार यांच्या विजयानंतर दहा दिवसांनी फटाक्यांच्या आतषबाजी, गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक जामखेड शहरातून काढण्यात आली. आ रोहित पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दि ३ डिसेंबर २०२४ रोजी भव्य विजयी रॅली काढली होती.
यावेळी एकवीस जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली.
मिरवणुक ऐन रंगात आली असता पावसानेही जोर धरला. तब्बल दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली. अशा पावसातही आमदार रोहित पवार व कार्यकर्त्यांनी मिरवणूकीत जोश कायम ठेवल्याचे दिसत होते.

यावेळी मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी महिलांनी आ रोहित पवार यांचे औक्षण केले. मिरवणूक मार्ग संपुर्ण गुलालमय झालेला दिसत होता. सर्व सामान्य जनतेच्या मते आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीसाठी वरूण राजाने हजेरी लावली अशी चर्चा आहे.

यावेळी जेसीबीच्या साहाय्याने आमदार रोहित पवार यांना हार घालण्यात आला. .कोठारी पेट्रोल पंपा समोरून सायं ५ वाजता मिरवणूकीला सुरूवात झाली. शहरातील नगर रोड, बीड रोड,आदी मुख्य रस्त्यावरुन जात ही मिरवणुक रात्री उशिरापर्यंत चालूच होती. सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरा पर्यंत सुरूच होती यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद व उत्साह दिसून आला

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!