Homeव्हिडिओ बातम्यागटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेंच्या काळात शिक्षण विभागाचे व शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद-:आ. रोहित पवार

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेंच्या काळात शिक्षण विभागाचे व शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद-:आ. रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी

आज जामखेड कर्जत तालुक्याचे भाग्यविधाते, आ. श्री रोहित पवार यांनी नवभारत साक्षरता अभियान मुख्याध्यापक कार्यशाळा व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस विजेत्या शाळांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात उपस्थित राहून जामखेड तालुक्यात गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कार्यकाळात एक शैक्षणिक क्रांती झाली आहे.याचाच परिणाम म्हणून जि प प्रा शाळा सारोळा शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. जि.प.प्राथ.शाळा सारोळा, तालुक्यात प्रथम जि.प.प्राथ.शाळा नायगाव, द्वितीय शाळा मुंगेवाडी, तृतीय शाळा पोतेवाडी यांच्या सन्मान आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

आ.रोहित पवार म्हणाले की, तालुक्यातील सर्व शाळांना लवकरच शौचालयाचे युनिट देण्याचा माणस आहे. मिरजगाव व जामखेड शाळा युनिट एक माँडेल करण्याचे काम चालू आहे.त्यानंतर तालुक्यातील 200 शाळा माँडेल स्कूल तयार करण्याचा प्रयत्न आहे. हया सर्व शाळा जागतीक स्तरावर स्पर्धा करणाऱ्या शाळा असतील. शाळेतील मुलांना पॅड, इ लर्निग साहित्य, खाऊ वाटप ,खेळाचे साहित्य वाटप करण्याचा दृष्टीकोन स्पर्धेच्या युगात ग्रामिण भागातील मुले कुठेही कमी पडू नयेत हाच आहे.रोहित पवार यांनी आपल्या भाषणात सर्वच शिक्षणाच्या बाबींवर सविस्तर विवेचन केले. जुनी पेन्शनचा मुद्दाही घेतला. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेबांचे खूपच मनापासून कौतुक केले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

यावेळी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक श्री.अमोल राळेभात,कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,प्रशांत राळेभात,श्रीकांत लोखंडे,बाप्पू कार्ले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.    यावेळी शिक्षकांमधून नारायण राऊत ,एकनाथ चव्हाण,श्रीम.कामिनी राजगुरु मॅडम यांनी सर्वांनीच शिक्षण विभाग, शिक्षक आणि शाळा याबाबत धनवेसाहेबांचा सकारात्मक दृष्टीकोन मांडला.जामखेड तालुक्याच्या परिवर्तनाच्या वाटेवरचा आलेख मांडला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंदराज सातपुते तर आभार केशवराज कोल्हे यांनी मानले. एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सर्व मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!