Homeव्हिडिओ बातम्याखैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे शेतकरयाचे खर्डा येथे रास्ता रोको आंदोलन.शिर्डी...

खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे शेतकरयाचे खर्डा येथे रास्ता रोको आंदोलन.शिर्डी खर्डा हैदराबाद काही तास रस्ता बंद. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे शेतकरयांचा खर्डा येथे रास्ता रोको आंदोलन

शिर्डी खर्डा हैद्राबाद रास्ता काही तास बंद
तहसिलदारांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे उसाचे पीक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दि२७ मार्च रोजी खर्डा बस स्थानकासमोर शिर्डी – हैदराबाद राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

याप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले की,जोपर्यंत खैरी मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे या परिसरातील हजारो टन ऊस पाण्याच्या प्रतीक्षात आहे, जर वीज बंद ठेवली तर उभ्या पिकाला पाणी देता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून याचा खर्डा बाजारपेठेवर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाने आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी खैरी मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी प्रकल्पात आज रोजी १६०.५१द.ल.घ.फु. उपयुक्त पाणीसाठा व मृत ४८.३८ द.ल.घ.फु.आहे तर
एकूण२०८.८९ द.ल.घ.फु. एकूण पाणीसाठा आहे, तसेच सध्या खैरी प्रकल्पात पाण्याची ३३.०८ टक्केवारी असल्याचे सांगितले.

हे रास्ता रोको आंदोलन चिघळत असताना खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी मध्यस्थी करून जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना फोन करून माहिती दिली, त्यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की, आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या विनंती अर्ज व भावना मी प्रांतसाहेब कर्जत यांच्यासमोर समक्ष ठेवून चर्चा करतो, व पुढील मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी मोबाईलद्वारे संभाषण करून केले. यावेळी शेतकऱ्यांनी सोमवार पर्यंत मार्ग काढण्याचे तहसीलदार यांना सांगितले, तसेच तोपर्यंत या परिसरात वीज कर्मचारी पाठवू नये अशी विनंती त्यांनी केली.

त्यानंतर खैरी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे, सर्कल संतोष नवले, तलाठी मोराळे भाऊसाहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या उपस्थितीत हे रास्ता रोको आंदोलन एक तासानंतर मागे घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,दत्तात्रय भोसले, चंद्रकांत गोलेकर, शिवाजी भोसले, कल्याण सुरवसे, श्रीकांत लोखंडे, आजिनाथ लटके,शंकर गुळवे,गणेश लटके,राजेंद्र भोसले,दादा शिकारे, नाना शेळके, आबा केसकर, पांडुरंग भोसले, काका शेळके, अण्णा सावंत, इत्यादी सह बहुसंख्य परिसरातील शेतकरी या रास्ता रोको आंदोलनात उपस्थित होते.

चौकट
पोलिसांची कार्यतत्परता..

स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी खर्डा बस स्थानकासमोरील शिर्डी- हैदराबाद राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले, परंतु पोलिसांनी तुळजापूरकडे जाणाऱ्या गाड्या जातेगाव चौकातून शुक्रवार पेठ मार्ग रस्त्याने वळविण्यात आल्या तर जामखेडकडे जाणारी वाहने मार्केट कमिटी मार्गे जातेगाव चौकातून पुढे पाठविण्यात त्यांना यश आले त्यामुळे या रास्ता रोको आंदोलनाचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका न बसता प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!