जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खामगाव पाटोदा(गरड) येथे लोखंडी पाईप सत्तरने मारहाण करत दगडाने दरवाजा तोडुन जबरी चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी ४ अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा नोंद क्र 562/24,
कलम 309 (6), 331 (4) भा. न्याय संहितेनूसार गून्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णू अश्रू वाघमोडे, वय 37 वर्षे, रा ठी खामगाव पोस्ट पाटोदा ता. जामखेड यांनी फिर्यादीत म्हटले आहे की
फिर्यादी हे त्यांचे राहते घरी खामगाव पोस्ट पाटोदा या गावी घराचे दोन पैकी एक रूम मध्ये झोपले होते होते तर दुसरे रूममध्ये फिर्यादी यांच्या आई पत्नी व मुले झोपली होती तसेच फिर्यादी यांचे वडील हे बाहेरील बाजूचे जनावरांचे गोठ्यामध्ये झोपले होते.
मध्यरात्री म्हणजेच दिनांक 09. 11.2024 रोजी रात्री 01.00 वाजता चे सुमारास झोपेत असताना फिर्यादी यांना खूप मोठा आवाज ऐकायला आला म्हणून त्यांनी दरवाजा उघडून पाहिले बाहेर पाहिले असता तीन अनोळखी इसम हातात लोखंडी पाईप, सत्तुर व काठी घेऊन उभे असल्याचे दिसले तसेच त्यांनी दगडाच्या सहाय्याने महिला झोपलेल्या दुसऱ्या रूमचा दरवाजा तोडल्याचे फिर्यादींचे लक्षात आले.
फिर्यादी हे घराबाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले असता फिर्यादींना मारहाण करून घरात ढकलले तसेच सदर वेळी गोठ्यात झोपलेले फिर्यादींचे वडील हे आरोपींच्या दिशेने येत असताना आरोपीनी फिर्यादीचे वडील यांच्या डोक्यात लोखंडी पाईप ने मारहाण करून त्यांना दुखापत केली
आरोपी यांनी सामायिक इराद्याने फिर्यादी यांचे घरातील महिलांचे अंगावरील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा ऐवज फिर्यादी व त्यांचे वडील यांना मारहाण करून जबरीने जबरीने चोरी केला आहे.
तसेच फिर्यादी यांचे घराजवळच वस्तीवर राहणारे शेजारी महिला श्रीमती कांताबाई नवनाथ गाडेकर यांच्या घरी देखील फिर्यादींनी मारहाण करून त्यांचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 12 हजार रुपये
( एकूण 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे एक लाख 12 हजार रुपये ) अशा रकमेची मारहाण करून जबरीने चोरी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सहकारयांसह घटनास्थळी धाव घेतली.
सदर घटनास्थळी शानपथक व अंगुलीमुद्रा तज्ञ यांनी भेट दिलेले आहे.
आरोपींचा शोध घेण्याचा कसोशिने प्रयत्न चालू आहे. याबाबत कोंबिंग ऑपरेशन चालू आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी देखील भेट दिली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवलकर हे करीत आहेत. पाहिजे असलेल्या आरोपींसाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी कोंबिंग आपरेशन चालू केले आहे.