Homeव्हिडिओ बातम्याखामगावात दरोडा ;एकजण जखमी, एक लाखाचा ऐवज लंपास परिसरात भीतीचे...

खामगावात दरोडा ;एकजण जखमी, एक लाखाचा ऐवज लंपास परिसरात भीतीचे वातावरण

जामखेड प्रतिनिधी
दिवाळी नंतर चोरट्यांनी डोके वर काढले आहे.
जामखेड तालुक्यातील खामगाव येथे घराच्या अंगणात झोपलेल्या ६५ वर्षाच्या वृध्दावर दरोडेखोरांनी धारधार शस्त्राचा हल्ला करुन जखमी केले. तसेच महीलांच्या अंगावरील १ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. झालेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खामगाव येथे आश्रु नामदेव वाघमोडे वय ६५ हे शनिवार दि ९ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या बाहेरील शेड मध्ये झोपले होते.

यावेळी त्यांचा मुलगा विष्णु आश्रु वाघमोडे हे आपल्या कुटुंबासह घराच्या आत मधील खोलीत झोपले होते. यावेळी त्या ठिकाणी चार अज्ञात दरोडेखोर आले व फीर्यादी विष्णु वाघमोडे याच्या खोलीचे दार तोडुन आत शिरले व फीर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली व फीर्यादीस त्याच्या खोलीमध्ये कोंडुन घेतले व बाहेरून कडी लावली. यावेळी आश्रु वाघमोडे हे दरोडेखोरांना अडवण्यासाठी गेले असता दरोडेखोरांनी धारधार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. यानंतर फीर्यादीची आई, पत्नी व भावजई यांच्या खोलीचा दरवाजा तोडुन महीला व लहान मुलांच्या अंगावरील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा फीर्यादी यांच्या गावातील श्रीमती कांताबाई नवनाथ गाडेकर यांच्या देखील घरात घुसून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातील १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. असे एकुण चोरट्यांनी १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेत आश्रु वाघमोडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जामखेड येथील खाजगी समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, नंदकुमार सोनवलकर यांनी भेट दिली. याप्रकरणी विष्णु वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!