खर्डा येथील मुलाचा विहिरीत मृतदेह आढळला
भुम येथील आश्रम शाळेत शिकत होता:
आश्रम शाळा सुरक्षित नाही
घातपाताचा संयम नातेवाईकांचा महामार्गावर चक्का जाम आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
खर्डा येथील मूलगा मातोश्री कै.लो. सू. तरंगे आश्रमशाळेत शिकत होता. दोन दिवसांपासून गायब असलेल्या मूलाचा शाळेजवळील विहिरीत मृतदेह आढळून आला. मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गून्हे दाखल करण्याची मागणी करत जवळपास एक तास नळी वडगाव फाटा भूम-खर्डा मार्गावर जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
याबाबत माहिती अशी की, नळी ता. भूम जि.धाराशिव येथे कै.लो.सू तरंगे माध्यमिक आश्रम शाळा आहे. या ठिकाणी खर्डा येथील आशिष बाळू काळे इयत्ता ९ वी मध्ये शिकत होता. तो दि३ ऑ २०२४ तारखेपासून शाळेतून संध्याकाळी६ वाजेपासून गायब होता. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्याच्या घरी फोन करून विचारणा असता घरच्यांनी आशिष हा घरी आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर दि४ ऑक्टोबर रोजी शाळेच्या जवळ एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला.
मृतदेह फुगून वर आला होता, त्याचे डोळे बाहेर पडले होते,जीब बाहेर आली होती, त्याच्या अंगावर अडरवियर शिवाय कपडे नव्हते. त्याच्या अंगावर चट्टे होते, गळ्याला वन होता, मान वाकडी झाली होती त्यामुळे त्याचा खूनच झाला असल्याचा नातेवाईकांनी व उपस्थितांनी आरोप करून संस्थेचे संचालक व तेथील शिक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यानंतर नळी वडगाव फाट्यावर सर्व आदिवासी पारधी समाजाने रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे.
यावेळी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे, बबलू सुरवसे, विशाल पवार, मधु पवार, गौतम पवार, रोहित काळे, वसंत पवार, अनिल काळेसह आदिवासी पारधी समाज बांधव व नागरिक हे उपस्थित होते.आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांनी मयत मुलाच्या आईचा तक्रारी अर्ज नोंदवून घेत व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215