महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री (ता. आंबड) या ठिकाणी गेली ७ दिवसांपासून अमरण उपोषणास बसलेल्या प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या अंदोलनाला पाठिंबा म्हणून खर्डा व खर्डा परिसरातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या दि. २१ जून रोजी खर्डा बंदची हाक दिली आहे. नागरिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेऊन अंदोलनास पाठींबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षण बचाव समितीच्या वतीने प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आजचा ७ वा दिवस असुन ते पाणीसुध्दा घेत नसल्याने त्यांची तव्येत अतिशय खालावलेली आहे. मात्र महाराष्ट्र शासन जाणुनबुजून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जाग यावी व या आदोलनाकडे सरकारने गांभिर्याने लक्ष द्यावे म्हणुन व प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दि २१/०६/२०२४ शुक्रवार रोजी कायदा व सुव्यवस्था आवाधीत ठेवुन शांततेच्या मार्गाने खर्डा शहर बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती खर्डा परिसरातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच याबाबतचे रितसर निवेदन तहसील कार्यालय व खर्डा पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215