जामखेड प्रतिनिधी
करोडोंचा घोटाळा केला. व्यापारी शेतकरी कष्टकरी सामन्य लोकांचा पैसा अडकवुन स्वतःला वाचविण्यासाठी ज्ञानराधाचे कुटे भाजपात गेले मात्र या फसवणूक झालेल्या ग्राहकांनी जायचे कूठे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी उपस्थित केला. ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत त्या सर्व सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना जामखेड शहरातील समन्वय समितीच्या वतीने निवेदन देवून विषयाची व्याप्ती लक्षात आणून दिली यावेळी रमेश म्हणाले की या प्रकरणातील अनेक लोक आजाराने ग्रासले आहेत. आपल्याला नक्कीच न्याय मिळेल पण आपल्या सर्वांना एकत्र येणे आवश्यक आहे चला तर मग येत्या शनिवारी एकत्र येवू आणी न्याय मिळवू असे सांगितले.
पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, प्रमोद राऊत, सुतार सर डॉ. प्रदीप कात्रजकर, संतोष शिंदे, संदीप गायकवाड, शिवलिंग राऊत पिंटू राळेभात आदी उपस्थित होते.
ज्ञानराधा को – ऑप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. सुरेश कुटे त्याची पत्नी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला म्हणून कारवाई केली जात नाही का असा प्रश्न उपस्थित केला.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्य ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु याक संस्थेकडून या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठीही आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती.
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळमुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को ऑप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत.
त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215